अजित पवार यांच्यानंतर सुनेत्रा पवार राज्याच्या उपमुख्यमंत्री, पण समोर असणार 'ही' 4 मोठी आव्हानं

व्हीडिओ कॅप्शन, अजित पवार यांच्या नंतर सुनेत्रा पवार राज्याच्या उपमुख्यमंत्री, पण समोर असणार 'ही' मोठी आव्हानं
अजित पवार यांच्यानंतर सुनेत्रा पवार राज्याच्या उपमुख्यमंत्री, पण समोर असणार 'ही' 4 मोठी आव्हानं

अजित पवारांच्या आकस्मिक निधनानंतर केवळ 'राष्ट्रवादी काँग्रेस' पक्षातलं नव्हे, तर महाराष्ट्रातलं सत्तासंतुलन बिघडलं. ते स्थिरस्थावर होण्यासाठी काही काळ जावा लागेल.

गेल्या काही वर्षांमध्ये अनेक अतर्क्य वाटाव्या अशा उलथापालथीतून गेलेल्या महाराष्ट्रासमोर पुन्हा एक नवा पेच उभा आहे.

तो सोडवण्याचा एक भाग म्हणून पक्षाकडून आणि 'महायुती'कडून अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आलं आहे.

महाराष्ट्राला स्थापनेनंतर मिळालेल्या त्या पहिल्याच महिला उपमुख्यमंत्री आहेत. अजित पवारांनंतर सुनेत्रा पवार यांच्यासमोर असणार 'ही' 4 मोठी आव्हानं

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)