'बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर' LIVE

व्हीडिओ कॅप्शन, BBC Indian Sportswoman of the Year - ISWOTY 2025 LIVE
वाचन वेळ: 1 मिनिटे

सहाव्या बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर (ISWOTY) पुरस्कार सोहळ्याची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. हा सोहळा आता नवी दिल्ली येथे पार पडत आहे.

हा पुरस्कार सोहळा तुम्ही बीबीसीच्या (भाषा सेवा) वेबसाइटवर पाहू शकता. तसेच फेसबुक आणि यूट्यूबवर याचे थेट प्रक्षेपण पाहू शकता.

या वर्षासाठीच्या नामांकनांची घोषणा 2 फेब्रुवारी रोजी करण्यात आली. यामध्ये पाच आघाडीच्या खेळाडूंचा समावेश आहे- क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर आणि स्मृती मंधाना, बुद्धिबळपटू दिव्या देशमुख, नेमबाज सुरुची सिंह आणि ॲथलीट ज्योती याराजी.

या पुरस्काराद्वारे, भारतीय महिला खेळाडूंनी 2025 मध्ये क्रीडा क्षेत्रात दिलेल्या योगदानाचा सन्मान केला जाणार आहे. देशातील क्रीडा विश्वाशी संबंधित सर्व महिलांच्या कामगिरीचा गौरव यातून केला जातो.

अधिक अपडेट्ससाठी #bbciswoty #changethegame या हॅशटॅग्जना फॉलो करा.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.