सोनम कपूरच्या नवऱ्याने रिसेप्शनला स्पोर्ट्स शूज का घातले?

सोनम कपूर आणि आनंद आहुजाचं लग्न थाटामाटात पार पडलं

फोटो स्रोत, TWITTER

फोटो कॅप्शन, सोनम कपूर आणि आनंद आहुजाचं लग्न थाटामाटात पार पडलं
वाचन वेळ: 3 मिनिटे

अभिनेत्री सोनम कपूर आणि उद्योगपती आनंद आहुजा मंगळवारी लग्नाच्या बेडीत अडकले. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या लग्नाची चर्चा #SonamKiShaadi आणि #SonamAnandKiShaadi या हॅशटॅग्सवर स्वार होऊन सोशल मीडियावर जोरदार रंगत आहे.

तुम्ही पण या शानदार लग्नाचे फोटो पाहिलेच असतील. आधी हळदीसाठी जमलेली बॉलिवुडची मंडळी, मग आलेल्या लग्नाची वरातीचे व्हीडिओस आणि आता रिसेप्शनचेही फोटो आले आहेत.

पण हे रिसेप्शनचे फोटो तुम्ही नीट पाहिले तर एक प्रश्न तुम्हाला नक्की पडू शकतो - नवरदेव आनंद आहुजाने काळ्या शेरवानीवर स्पोर्ट्स शूज का घातलेत?

सोनम कपूर आणि आनंद आहुजाच्या लग्नाचं रिसेप्शन

फोटो स्रोत, SUJIT JAISWAL/AFP/Getty Images

फोटो कॅप्शन, ते पाहा - काळा इंडो वेस्टर्नवर शेरवानी आणि त्याखाली स्पोर्ट्स शूज

साहजिकच नेहमीच सतर्क असलेल्या सोशल मीडियाच्या लोकांनी ही गोष्ट टिपली, आणि त्याबाबत चर्चा सुरू झाली.

"बुटं लपवण्याच्या कार्यक्रमात आनंदने खुशी आणि जान्हवीला 5 रुपयेसुद्धा दिले नाहीत. आणि त्यामुळे त्याला त्याचे बूट परत मिळालेच नाही. म्हणून आनंदने रिसेप्शनला स्पोर्ट्स शूज घातले होते," असं 'टाइम्स हाऊ' या पॅरडी अकाउंटने ट्वीट केलं आहे.

तर 'मदन चिकना' या हॅंडलवरून आलेलं एक ट्वीट होतं - "सोनम कपूरचं ड्रेसिंग आणि मेकअप एकीकडे, आणि आनंद आहुजाचे स्पोर्ट्स शूज एकीकडे."

आता तुम्ही म्हणाल, सोनम एवढी फॅशन आयकॉन असताना तिच्या नवऱ्याने असं भलतंच काँबिनेशन का घातलं? सर्वांनाच हा प्रश्न पडलेला.

नववधूचा साज केलेली सोनम कपूर

फोटो स्रोत, Twitter

फोटो कॅप्शन, नववधूचा साज केलेली सोनम कपूर

तर यामागचं खरं कारण म्हणजे, आनंद यांचं स्पोर्ट्स शूजवरचं प्रेम. त्याच्या इन्स्टाग्रामवरून त्याच्या या प्रेमाची वारंवार प्रचिती येते.

आनंदचं दिल्लीमध्ये 'व्हेज-नॉनव्हेज' नावाचं मल्टी ब्रँड स्नीकर्स शूजचं बुटीक आहे. त्यासोबतच तो 'शाही एक्सपोर्ट्स'चा मॅनेजिंग डायरेक्टर आहे. या प्रतिष्ठानाचा वर्षाला तीन हजार कोटींचा उलाढाल आहे.

सोनमचा भाऊ हर्षवर्धनने शेअर केलेला फोटो

फोटो स्रोत, Instagram / @harshvardhankapoor

फोटो कॅप्शन, सोनमचा भाऊ हर्षवर्धनने शेअर केलेला फोटो

अशात आनंदने हे शूज ब्रँड प्रमोशन करण्यासाठी घातले असतील, अशी शक्यात नाकारता येत नाही.

या रिसेप्शनच्या एक दिवस आधी सोनम आणि आनंदचा विवाहसोहळा मुंबईत मोठ्या थाटामाटात पार पडला. त्यांनी शीख पद्धतीने रीतसर लग्नगाठ बांधली.

सोनमने लग्नात लाल लेहंगा घातला होता, तर आनंदने पीच रंगाचा वेडिंग ड्रेस घातला होता.

सोनम कपूर आणि आनंद आहुजाच्या लग्नाचं रिसेप्शन

फोटो स्रोत, SUJIT JAISWAL/AFP/Getty Images

सोनमच्या लग्नात तिची खास मैत्रिण स्वरा भास्करसुद्धा आली होती. त्या दोघींनी 'रांझणा' आणि 'प्रेम रतन धन पायो' या चित्रपटात एकत्र काम केलं आहे.

सोनम कपूर आणि आनंद आहुजाच्या लग्नाचं रिसेप्शन

फोटो स्रोत, INSTAGRAM

सोनम आणि आनंदने एकत्र केक कापून आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात केली.

सोनम कपूर आणि आनंद आहुजाच्या लग्नाचं रिसेप्शन

फोटो स्रोत, EXPANDABLES

रिसेप्शनसाठी सोनमने ब्लॅक अँड व्हाईट ड्रेस घातला होता, आणि आनंदने इंडो-वेस्टर्न पोशाख घातला होता. आणि त्याखाली ते स्पोर्ट्स शूज.

सोनम कपूर आणि आनंद आहुजाच्या लग्नाचं रिसेप्शन

फोटो स्रोत, EXPANDABLES

लग्नानंतर मंगळवारी संध्याकाळी मुंबईच्या 'द लीला हॉटेल'मध्ये ग्रँड रिसेप्शन पार पडलं. या रिसेप्शन पार्टीला अवघं बॉलिवुड अवतरलं होतं.

सोनम कपूर आणि आनंद आहुजाच्या लग्नाचं रिसेप्शन

फोटो स्रोत, SUJIT JAISWAL/AFP/Getty Images

फोटो कॅप्शन, अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन
सोनम कपूर आणि आनंद आहुजाच्या लग्नाचं रिसेप्शन

फोटो स्रोत, SUJIT JAISWAL/AFP/Getty Images

फोटो कॅप्शन, रिसेप्शनमध्ये सैफ अली खान आणि करीना कपूर खान
line
शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा

फोटो स्रोत, SUJIT JAISWAL/AFP/Getty Images

फोटो कॅप्शन, शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा
line
चित्रपट निर्माता विधू विनोद चोप्रा, कंगना राणौत आणि निर्देशक राजकुमार हिरानी

फोटो स्रोत, SUJIT JAISWAL/AFP/Getty Images

फोटो कॅप्शन, चित्रपट निर्माता विधू विनोद चोप्रा, कंगना राणौत आणि निर्देशक राजकुमार हिरानी
line
शाहरूख आणि गौरी खान

फोटो स्रोत, SUJIT JAISWAL/AFP/Getty Images

फोटो कॅप्शन, शाहरूख आणि गौरी खान
line
माधुरी दीक्षित नेने

फोटो स्रोत, SUJIT JAISWAL/AFP/Getty Images

फोटो कॅप्शन, माधुरी दीक्षित नेने
line
घरची मंडळी

फोटो स्रोत, SUJIT JAISWAL/AFP/Getty Images

फोटो कॅप्शन, बोनी कपूर आणि परिवार
line
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट

फोटो स्रोत, SUJIT JAISWAL/AFP/Getty Images

फोटो कॅप्शन, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट
line
अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना

फोटो स्रोत, SUJIT JAISWAL/AFP/Getty Images

फोटो कॅप्शन, अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना
line
शाहीद कपूर आणि मीरा राजपूत

फोटो स्रोत, SUJIT JAISWAL/AFP/Getty Images

फोटो कॅप्शन, शाहीद कपूर आणि मीरा राजपूत

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)