Adani Group Share Price: गौतम अदानींच्या कंपन्यांचे शेअर्स कोसळले, अब्जावधींचा फटका

अदानी

फोटो स्रोत, Getty Images

वाचन वेळ: 2 मिनिटे

अदानी समूहातील कंपन्यांचे शेअर कोसळल्याने उद्योजक गौतम अदानी यांना अब्जावधी रुपयांचा फटका बसला आहे.

अदानी एंटरप्रायजेसचे शेअर अंदाजे 25 टक्क्यांनी घसरून 1201 रुपयांवर वर आले.

तर अदानी पोर्ट्स आणि अदानी स्पेशल इकोनॉमिक झोनचे शेअर 18.75 टक्क्यांनी घसरून आता 762 रुपयांवर आले आहेत.

यामुळे देशातल्या दुसऱ्या सर्वाधिक श्रीमंत माणसाच्या म्हणजेच गौतम अदानींच्या संपत्तीमध्ये कमालीची घट झाली आहे.

सोमवारी, 14 जूनला सकाळी शेअर मार्केट उघडल्यानंतर अदानी एंटरप्राईजेसचे शेअर्स धाडकन पडले. नॅशनल सिक्युरिटीज डिपोझटरी लिमिटेड या सरकारी संस्थेने 3 फॉरेन पोर्टफोलिओ अकाऊंट गोठवल्याच्या बातम्यांमुळे शेअर्समध्ये घसरण झाल्याचं सांगितलं जातंय. या पोर्टफोलिओ अकाऊंट्सची अदानी एंटरप्राईजेसमध्ये गुंतवणूक होती. अदानी समूहाने खाती गोठवल्याचे वृत्त फेटाळले आहे.

याव्यतिरिक्त अदानी ग्रीन एनर्जीचे शेअर्स 5 टक्क्यांनी कोसळून 1165.35 वर आले. अदानी टोटल गॅसचे शेअर 5 टक्क्यांनी घसरून 1544.55 वर आले. अदानी ट्रान्समिशनचे शेअर्स घसरून 1517.25 रुपयांवर आले तर अदानी पावर 4.99 ने गडगडून 140.90 वर आले.

या सगळ्या शेअर्सला लोअर सर्किट लिमिट लागलं.

शेअर बाजार

फोटो स्रोत, Getty Images

अदानी समूहाचे शेअर्स गडगडण्याआधी गेल्या 12 महिन्यांत त्यांची उत्तम कामगिरी होती. या स्टॉक्सची किंमत इतक्या वेगाने वाढली की 2021 मध्ये अदानी समूह सगळ्यांत वेगाने श्रीमंत होणारा समूह ठरला. समूहाच्या शेअर्सची किंमत सतत वाढत असल्याने गेल्या शुक्रवारपर्यंत आशियातले दुसरे सर्वाधिक श्रीमंत असणाऱ्या गौतम अदानी यांच्या श्रीमंतीत 43 अब्ज डॉलर्सची भर पडली होती.

'खाती गोठवण्याच्या बातम्या निराधार'

माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांनुसार नॅशनल सिक्युरिटीज डिपोझटरी लिमिटेट या संस्थेने 3 परकीय गुंतवणूक संस्थांची खाती गोठावली आहेत. या संस्थांची एकत्रितरित्या अदानी समूहाच्या 4 कंपन्यांमध्ये गुंतवणूक आहे. या बातम्या अदानी समूहाने फेटाळाल्या आहेत.

3 एफपीआय खाती गोठवण्याच्या बातम्यांवर अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकोनॉमिक झोन्सकडून स्पष्टीकरण दिलं गेलं आहे. त्यात म्हटलंय की या बातम्या निराधार आहेत.

गौतम अदानी

फोटो स्रोत, Getty Images

त्यांनी आपल्या स्पष्टीकरणात लिहिलं की, "आम्हाला हे सांगताना वाईट वाटतंय पण हा रिपोर्ट चुकीचा आहे आणि मुद्दाम आमच्या गुंतवणुदारांना गोंधळात पाडण्यासाठी दिलेला आहे. यामुळे आमच्या उद्योग समूहाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होतंय."

अदानी समूहाने पुढे असंही म्हटलं की, "या बातम्यांची गंभीरता आणि लहान लहान गुंतवणूकदारांवर याचा होणारा परिणाम यामुळे आम्ही या तीन फंड्सच्या डीमॅट अकाऊंटच्या परिस्थितीबद्दल रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजेंटकडे अर्ज केलेला आहे. याची लिखित पुष्टी आम्हाला इमेलव्दारे 14, 2021 ला मिळालेली आहे. यात असं स्पष्ट केलेलं आहे का या फॉरेन फंड्सच्या ज्या डीमॅट अकाऊंटमध्ये अदानी ग्रुपचे शेअर्स आहेत त्यांना गोठवलेलं नाही."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)