शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीचा 'राष्ट्र मंच'शी संबंध नाही - राष्ट्रवादीचा खुलासा

फोटो स्रोत, Getty Images
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (22 जून) दिल्लीत विरोधी पक्षांची महत्त्वाची बैठक बोलवली आहे. सोमवारी शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची भेट झाली.
त्यानंतर आजच्या राष्ट्र मंचच्या बैठकीचा आणि प्रशांत किशोर यांनी पवारांची भेट घेण्याबाबत खलबतं सुरू झाली.
या दोन्ही बैठकींचा परस्परांशी संबंध नसल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी बीबीसी मराठीला दिली. आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक पार पडली. त्या बैठकीनंतर प्रफुल्ल पटेलांनी ही माहिती दिली.
आज सायंकाळी होणाऱ्या बैठकीला आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस, आरजेडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचे नेते उपस्थित राहणार आहेत.
"प्रशांत किशोर-शरद पवार यांच्यामध्ये झालेली बैठक आणि आज होणारी राष्ट्र मंचाची बैठक या दोन्ही राजकीय घडामोडींमध्ये काही संबंध नाही. शरद पवार यांच्याकडून कुठलाही आमंत्रण गेलेले नाही राष्ट्र मंचाच्या लोकांनी आमंत्रण देऊन लोकांना बोलावलं आहे," असं पटेल यांनी स्पष्ट केलं.
लोकसभेच्या आगामी अधिवेशनाबाबत यामध्ये चर्चा होईल, शिवाय देशातील राजकीय परिस्थितीवरही चर्चा केली जाईल, असं म्हटलं जात आहे.
बैठकीसाठी कोणाला निमंत्रण?
या बैठकीला तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी, राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव, जम्मू काश्मिरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दूल्ला, आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह, सीपीआयचे नेते डी राजा, यशवंत सिन्हा, माजी राज्यसभा खासदार केटीएस तुलसी यांना निमंत्रण आहे.
त्याव्यतिरिक्त संजय झा, पवन वर्मा, न्यायमूर्ती ए. पी. सिंह, करण थापर, जावेद अख्तर, सुधींद्र कुलकर्णी, के. सी. सिंह, अर्थतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकारही बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्वीट करून ही माहिती दिली.
ही राष्ट्रमंचची बैठक?
यशवंत सिन्हा यांनी ट्वीट करून मंगळवारी (22 जून) शरद पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्र मंचची बैठक होणार असल्याचं म्हटलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
सिन्हा यांनी तीन वर्षांपूर्वी म्हणजे 2018 मध्ये 'राष्ट्र मंच'चे समन्वयक आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरी मंगळवारी (22 जून) जी बैठक होणार आहे, ती 'राष्ट्र मंच'च्या बॅनरखाली होणार आहे, असं यशवंत सिन्हा यांनी स्पष्ट केलंय.
ट्विटरवर या मीटिंगबद्दल माहिती देणाऱ्या यशवंत सिन्हा यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं की, याआधी राष्ट्रमंचची बैठक व्हायची तेव्हा कोणाच्या लक्षातही यायचं नाही.
शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची दिल्लीतही भेट
या बैठकीपूर्वी त्यांनी आज (21 जून) राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांची दिल्ली येथे भेट घेतली. गेल्या दहा दिवसांत शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात दोन वेळा चर्चा झाली आहे.
त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न करत आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
11 जून रोजी प्रशांत किशोर यांनी शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली होती. यावेळी दोघांमध्ये तब्बल तीन तास चर्चा झाली होती.
प्रशांत किशोर यांनी नुकत्याच झालेल्या पश्चिम बंगाल आणि तमिळनाडू निवडणुकांमध्येही सहकार्य केले होते. त्यामुळे आगामी 2024 लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार तिसरी आघाडी उघडणार असल्याचीही चर्चा सुरू आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 3
नवाब मलिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (22 जून) दुपारी चार वाजता शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी विरोधी पक्षांची बैठक होणार आहे.
नवाब मलिक यांनी सांगितलं, "संपूर्ण देशातील सर्व विरोधी पक्षांची मोट बांधण्याचे काम उद्यापासून शरद पवार करणार आहेत."
राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्यासोबत झालेल्या चर्चेत त्यांनी देशातील राजकीय परिस्थितीबाबत त्यांच्याकडील माहिती दिल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.
मलिक पुढे म्हणाले, "उद्या मोजक्या पक्षांसोबत चर्चा होणार असून त्यानंतर हळूहळू इतर पक्षांना कसं एकत्र आणता येईल त्याबाबतीत हे नेते बसून ठरवणार आहेत."
काँग्रेसला बैठकीतून वगळले?
या बैठकीला आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस, आरजेडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचे नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली. पण काँग्रेसला या बैठकीत बोलवण्यात आलं आहे का हे अजून स्पष्ट नाही.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शरद पवार यांना अप्रत्यक्ष टोला लगावला. ते म्हणाले, "याआधी सुद्धा शरद पवार यांनी विरोधी पक्षाची मोट बांधण्याचा प्रयत्न केला होता. ही चांगली गोष्ट आहे. पण पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारवेळी ते आम्हाला काही महिने आधीच सोडून गेले होते. पण त्यांचे प्रयत्न सुरू राहू देत."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)