महाराष्ट्र शिक्षण : पहिली ते 12 वीच्या शालेय अभ्यासक्रमात 25% कपात

विद्यार्थी

फोटो स्रोत, Getty Images

वाचन वेळ: 1 मिनिटे

राज्यातली कोव्हिडची परिस्थिती आणि ऑनलाईन सुरु असणारं शिक्षण लक्षात घेत राज्य शिक्षण मंडळाने यावर्षीसाठीच्या अभ्यासक्रमात कपात केलीय.

पहिली ते 12 वी साठीचा अभ्यासक्रम कमी करण्यात येत असल्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे.

कोव्हिडची साथ सुरू झाल्यापासून राज्यात ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. गेल्यावर्षीही यामुळेच अभ्यासक्रमात 25 टक्के कपात करण्यात आली होती.

संसर्गाची दुसरी लाट आल्यानंतर याही वर्षी ऑनलाईन अभ्यासच सुरू आहे. त्यामुळे अभ्यासक्रम कमी करण्यात यावा अशी मागणी शिक्षक संघटना, मुख्याध्यापक यांनी केली होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आलाय.

कमी केलेल्या अभ्यासक्रमाबद्दलची माहिती लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटलंय.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

काहीच दिवसांपूर्वी महाराष्ट्रातल्या शाळा सुरू करण्याबद्दल एक नियमावली जाहीर केली होती.

कोव्हिड-मुक्त गावातील ग्रामपंचायतीने त्यांच्या अखत्यारित असणाऱ्या गावातील आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यापूर्वी पालकांशी चर्चा करुन ठराव करावा आणि शाळा सुरू करताना विद्यार्थ्यांना टप्प्याटप्प्यात शाळेत बोलवण्यात यावे. प्राधान्याचे विषय ठरवून वेळापत्रक तयार करण्यात यावं अशा सूचना याद्वारे देण्या आल्या होत्या.

केवळ कोव्हिड-मुक्त भागातील शाळा सुरू करता येऊ शकतात असा निर्णय राज्य सरकारने घेतला होता.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)