एकनाथ शिंदे : 'ओबीसी आरक्षणाविना निवडणुका नको'

एकनाथ शिंदे
वाचन वेळ: 3 मिनिटे

"ओबीसी आरक्षणाविना महापालिका किंवा इतर निवडणुका घेण्यात येऊ नयेत, अशी आमची भूमिका आहे," असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.

दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्यासोबत उपस्थित होते.

एकनाथ शिंदे म्हणाले, "आमच्या यंदाच्या दिल्ली दौऱ्यात राष्ट्रपती, गृहमंत्री, संरक्षण मंत्री तसंच भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. आज संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहोत. आम्ही शिवसेना आणि भाजप युती करून निवडणुका लढवल्या होत्या. लोकांच्या मनात होतं त्याप्रमाणे युतीचं सरकार आम्ही स्थापन केलं आहे. त्यानंतर वरीष्ठ नेत्यांच्या भेटीला आम्ही आलो आहोत."

ते पुढे म्हणाले, "हे सरकार लोकांचं आहे. लोकांच्या हिताचं जपणूक करणार आहे. समाजातील सर्वच घटकांना न्याय देणारं हे सरकार आहे. आता पंतप्रधानांना भेटून राज्याच्या विकासात त्यांचं व्हिजन आम्ही समजून घेणार आहोत."

"दिल्ली दौऱ्यात ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात तुषार मेहता यांच्याशी चर्चा केली. ओबीसी आरक्षणाविना महापालिका किंवा इतर निवडणुका घेण्यात येऊ नयेत, अशी आमची भूमिका आहे," असं त्यांनी म्हटलं.

एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस

"महाराष्ट्राचे तुकडे करण्याचा प्रश्नच नाही. काही जण लोकांची दिशाभूल करण्यासाठी अशा प्रकारचे वक्तव्य करत आहेत," असं शिंदे म्हणाले.

"बंड केलेले आमदार पैशांच्या मागे गेले नाहीत. बाळासाहेबांच्या विचाराने ते आमच्यासोबत आले आहेत. आम्हाला 164 आमदारांचं समर्थन आहे, त्यामुळे मध्यावधी निवडणुका घेण्याचा प्रश्न नाही," असंही त्यांनी म्हटलं.

शिंदे-फडणवीस यांची राष्ट्रपतींशी भेट

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रपती भवनात जाऊन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली.

आषाढी एकादशीच्या एक दिवस आधी झालेल्या या भेटीत मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रपतींना विठोबा-रखुमाईची मूर्ती भेट म्हणून दिली.

एकनाथ शिंदे

फोटो स्रोत, Twitter/@MahaGovtMic

महाराष्ट्र सदनाच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना अभिवादन करून एकनाथ शिंदे राष्ट्रपतींच्या भेटीला गेले.

राष्ट्रपतींच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली.

जे पी नड्डा

फोटो स्रोत, BJP

यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री राजनाथ शिंह यांचीही भेट घेणार आहेत.

राष्ट्रपती भवन

फोटो स्रोत, Rashtrapati Bhavan

आज दुपारी 1 ते 4 वाजण्याच्या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत ते काय माहिती देतात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.

देवेंद्र फडणवीस, अमित शाह आणि एकनाथ शिंदे

फोटो स्रोत, @Dev_Fadnavis

या तिन्ही नेत्यांमधील बैठक रात्री उशिरापर्यंत जवळपास चार तास सुरू झाली. पावणेदहाला ही बैठक सुरू झाली आणि रात्री दोन वाजता ही बैठक संपली.

शाहांसोबतच्या बैठकीचा तपशील अजूनही कळू शकलेला नाही. मात्र, खातेवाटप आणि सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या खटल्याबाबत या बैठकीत चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)