शिवसेनेचा उपराष्ट्रपतिपदासाठी मार्गारेट अल्वांना पाठिंबा

मार्गारेट अल्वा

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मार्गारेट अल्वा
वाचन वेळ: 3 मिनिटे

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या मार्गारेट अल्वा भारताच्या उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधी पक्षांकडून उमेदवार असतील. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मार्गारेट अल्वांच्या नावाची घोषणा केली.

नवी दिल्लीत शरद पवारांच्या निवासस्थानी विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवारासाठी मार्गारेट अल्वांच्या नावावर विरोधकांचं एकमत झालं.

शरद पवारांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला काँग्रेसकडून मल्लिकार्जुन खर्गे, माकपकडून सीताराम येचुरी, शिवसेनेकडून संजय राऊत आणि इतर नेते सहभागी झाले होते.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

मार्गारेट अल्वांना शिवसेनेचा पाठिंबा

दुसरीकडे, शिवसेनेनं राष्ट्रपतिपदासाठी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मूंना पाठिंबा दिला असला, तरी उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधी पक्षांच्या उमेदवार मार्गारेट अल्वांना पाठिंबा दिलाय.

याबाबत शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले, "द्रौपदी मुर्मू आदिवासी महिला आहेत आणि देशात आदिवासींप्रती सहानुभूती आहे. आमचे अनेक आमदार-खासदार आदिवासी समाजातून येतात. त्यामुळे आम्ही त्यांना समर्थन दिलं. मात्र, उपराष्ट्रपतिपदासाठी आम्ही मार्गारेट अल्वांना पाठिंबा जाहीर करत आहोत."

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

मार्गारेट अल्वा कोण आहेत?

मार्गारेट अल्वा मूळच्या कर्नाटकातील आहेत. पाचवेळा खासदार म्हणून काम केलेल्या मार्गारेट अल्वांनी केंद्रीय मंत्रिपदीही काम केलंय.

गुजरात, गोवा, राजस्थान आणि उत्तराखंडचं राज्यपालपदही त्यांनी भूषवलंय.

उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत त्यांना एनडीएचे उमेदवार जगदीप धनकड यांचा सामना करावा लागणार आहे.

जगदीप धनकड यांना भाजपकडून उपराष्ट्रपतिपदासाठी उमेदवारी

उपराष्ट्रपतिपद निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. पश्चिम बंगालचे विद्यमान राज्यपाल जगदीप धनकड यांना भाजपप्रणित NDA कडून उमेदवारी देण्यात आली.

भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज (16 जुलै) संध्याकाळी आयोजित पत्रकार परिषदेत जगदीप धनकड यांच्या नावाची घोषणा केली.

यावेळी नड्डा म्हणाले, "भाजप आणि NDA कडून उपराष्ट्रपतिपदासाठी शेतकरी पुत्र जगदीप धनकड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ते सध्या पश्चिम बंगालचे राज्यपाल आहेत. सुमारे 30 वर्षांपासून ते सार्वजनिक जीवनात कार्यरत आहेत."

X पोस्टवरून पुढे जा, 3
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 3

जगदीप धनकड यांची उमेदवारी जाहीर होण्याच्या एक दिवस आधी त्यांनी दिल्ली येथे गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

राजकीय प्रतिक्रिया

धनकड यांना उपराष्ट्रपतिपदाची उमेदवारी देम्यात आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

जगदीप धनकड

फोटो स्रोत, facebook

पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्विट करून म्हणाले, "शेतकरी पुत्र जगदीप धनकड आपल्या विनम्रतेसाठी ओळखले जातात. त्यांच्याकडे कायदेशीर, विधीमंडळाचा तसेच गव्हर्नर पदाचा चांगला अनुभव आहे. त्यांनी नेहमीच शेतकरी, तरूण, महिला आणि वंचितांच्या भल्यासाठी काम केलं आहे. ते आमचे उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार आहेत, याचा मला आनंद वाटतो."

X पोस्टवरून पुढे जा, 4
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 4

मोदी पुढे म्हणाले, "जगदीप धनकड यांच्याकडे संविधानाची चांगली माहिती आणि समज आहे. ते लोकप्रतिनिधींशी संबंधित प्रकरण चांगल्या प्रकारे समजू शकतात. मला विश्वास आहे की राज्यसभेसाठी ते उत्तम अध्यक्ष सिद्ध होतील. देशाला पुढे नेण्याच्या दृष्टीने सभागृहाच्या कार्यवाहीचं नेतृत्व ते करतील."

पश्चिम बंगालमधील प्रमुख भाजप नेत्यांपैकी एक तसेच मेदिनीपूर येथून खासदार असलेले दिलीप घोष यांनीही ट्विट करून धनकड यांना शुभेच्छा दिल्या.

X पोस्टवरून पुढे जा, 5
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 5

उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत नुकतेच मंत्रिपदाचा राजीनामा दिलेले मुख्तार अब्बास नकवी यांना उमेदवारी मिळेल, अशी शक्यता माध्यमांमध्ये वर्तवण्यात येत होती. पण पश्चिम बंगालचे राज्यपाल धनकड यांची उमेदवारी जाहीर करून भाजपने सर्वांना धक्का दिला.

त्याच मुख्तार अब्बास नकवी यांनीही जगदीप धनकड यांना शुभेच्छा दिल्या.

X पोस्टवरून पुढे जा, 6
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 6

धनकड यांचा राजकीय प्रवास

जगदीप धनकड हे मूळचे राजस्थान येथील आहेत. ते 1989 ते 1991 याकालावधीत जनता दलाच्या तिकिटावर लोकसभेचे खासदार होते. त्यापूर्वी 1993 ते 1998 दरम्यान त्यांनी राजस्थानच्या किशनगढ येथून विधानसभेचे आमदार होते.

सुरुवातीला व्यवसायाने वकील आणि नंतर नेते असा प्रवास केलेल्या धनकड यांची पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून नियुक्ती 2019 मध्ये करम्यात आली होती. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी अनेक प्रसंगांमध्ये त्यांचे झालेले वादही अनेकवेळा समोर आले होते.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)