चीनने दाखवला गलवान झटापटीचा व्हीडिओ- पाहा पहिला हल्ला कोणी केला?

फोटो स्रोत, Getty Images
ग्लोबल टाइम्स या चीनच्या सरकारी प्रसारमाध्यमाकडून गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक झटापटीचा व्हीडिओ जारी करण्यात आला आहे. गेल्यावर्षी जून महिन्यात भारतीय सैन्य आणि चिनी सैन्य यांच्यात गलवान खोऱ्यात हिंसक झटापट झाली होती.
या झटापटीत भारताचे 20 सैनिक मृत्युमुखी पडले होते. तर दुसरीकडे, चीननेही या झटापटीत आपले चार सैनिक मृत्युमुखी पडल्याचे गुरुवारी (18 फेब्रुवारी) मान्य केले.
चीनकडून जारी करण्यात आलेल्या या व्हीडिओत मृत्युमुखी पडलेल्या चार सैनिकांना सलामी देत असल्याचे दृश्य आहे. या व्हीडिओत भारत आणि चीनच्या सैनिकांची झटापटही दिसतेय. दोन्ही देशातील अधिकारी चर्चा करत असल्याचेही व्हीडिओत दिसतंय.
व्हीडिओ जारी करतानाच चीनकडून भारताला इशारा देत म्हटलं गेलंय की, "एप्रिलनंतर संबंधित परदेशी सैन्य जुन्या कराराचं उल्लंघन करत होती. त्यांनी पूल आणि रस्ते बनवण्यासाठी सीमा ओलांडली आणि पुनर्ररचना अभियानही चालवलं."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
व्हीडिओत पुढे म्हटलंय की, "परदेशी सैन्याने मूळ स्थितीत बदल करण्यासाठी एकतर्फी प्रयत्न केले आणि त्याचा परिणाम सीमेवर वेगानं तणाव वाढण्यात झाला."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
चीननं म्हटलंय, "कराराचा आदर करत आम्ही चर्चेतून परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला."
चीनकडून जारी करण्यात आलेल्या या व्हीडिओत रात्रीच्या अंधारात दोन्ही देशातील सैन्य एकमेकांना भिडत असल्याचे दिसते आहे. एका जखमी चिनी सैनिकाला दुसरा सैनिक सांभाळतानाही दिसतोय. तसंच, मृत्युमुखी पडलेल्या सैनिकाला इतर सैनिक सलामी देतानाही दिसतायेत.
गलवान खोऱ्यात सैनिक मृत्युमुखी पडल्याचं चीननं केलं मान्य
2020च्या जूनमध्ये पूर्व लडाखमधल्या गलवान खोऱ्यात भारतीय लष्करासोबत झालेल्या झटपटीमध्ये आपले 5 अधिकारी आणि सैनिक मारले गेल्याचं चीनने पहिल्यांदाच मान्य केलंय.
चिनी सैन्याच्या पीएलए डेली (PLA Daily) या अधिकृत वर्तमानपत्राचा दाखला देत चीनमधलं सरकारी वर्तमानपत्र ग्लोबल टाईम्सने पहिल्यांदाच 'आपल्या सार्वभौमत्वाचं संरक्षण करताना प्राणांची आहुती देणाऱ्या सैनिकांना श्रद्धांजली देण्यासाठी' त्यांची नावं आणि माहिती छापली आहे.

फोटो स्रोत, AFP
काराकोरम पर्वतांमधल्या या 5 अधिकारी आणि सैनिकांची चीनच्या सेंट्रल मिलिट्री कमिशनने ओळख पटवली असून त्यांचा पदवी देऊन सन्मान करत असल्याचं PLA डेलीच्या शुक्रवारच्या वृत्तात म्हटलंय.
या अहवालामध्ये पहिल्यांदाच चिनी सैन्याने गलवानमधल्या झटापटीचा तपशील दिला आहे. 'कशाप्रकारे भारतीय लष्कराने तिथे मोठ्या प्रमाणात सैनिक पाठवून त्यांना लपवून ठेवलं आणि ते कशाप्रकारे ते चिनी सैन्याला माघार घ्यायला भाग पाडत होते' हे यामध्ये सांगण्यात आलंय.
'स्टीलचे दंडुके, खिळे लावलेले दंडुके आणि दगडांच्या हल्ल्यादरम्यान चीनच्या सैनिकांनी कशाप्रकारे देशाच्या सार्वभौमत्वाचं रक्षण केलं,' हे देखील यामध्ये सांगण्यात आलंय.
PLA डेलीच्या वृत्तात म्हटलंय, "एप्रिल 2020नंतर परदेशी सैन्याने आधीच्या कराराचं उल्लंघन केलं. रस्ते आणि पूल तयार करण्यासाठी ते सीमा पर करू लागले आणि सीमेवरची परिस्थिती बदलत जाणीवपूर्वक चिथावणी देण्यात आली. बोलणी करण्यासाठी पाठवण्यात आलेल्या चिनी सैनिकांवरही त्यांनी हल्ला केला."
चीनचे एक जवान चेन शियांगराँह यांचा उल्लेख करत या वर्तमानपत्राने लिहीलंय, "शत्रूंची संख्या खूप जास्त असली तरी आपण गुडघे टेकणार नाही, त्यांनी दगडांनी हल्ला करूनही आम्ही त्यांना पळवून लावलं, असं या सैनिकाने त्याच्या डायरीमध्ये लिहीलंय."
गलवानमधली झटापट
गेल्या वर्षीच्या 15 जूनला पूर्व लडाखमधल्या गलवान खोऱ्यात झालेली ही झटापट म्हणजे गेल्या चार दशकांमधला भारत - चीन सीमेवरचा सगळ्यात गंभीर संघर्ष असल्याचं म्हटलं गेलं.
यामध्ये 20 भारतीय सैनिक मरण पावले. आपले सैनिक मारले गेल्याचं भारताने त्याचवेळी जाहीर केलं होतं. पण चीनने आतापर्यंत कधीही आपले किती सैनिक मारले गेले, याविषयीची माहिती दिली नव्हती.

फोटो स्रोत, Getty Images
पण या झटापटीदरम्यान चीनचं मोठं नुकसान झाल्याचा दावा भारताने केला होता.
या संघर्षामध्ये चीनचे 45 सैनिक मारले गेल्याचं वृत्त 'तास' या रशियन वृत्तसंस्थेने दिलं होतं.
भारताच्या तुलनेत चीनचं जास्त नुकसान झालं होतं या दाव्यांचं उत्तर देण्यासाठीच चीनने गलवान खोऱ्यात किती सैनिक मारले गेले याविषयीची माहिती दिली असल्याचं शिन्हुआ युनिव्हर्सिटीमधल्या नॅशनल स्ट्रॅटिजी इन्स्टिट्यूटचे संचालक चियान फेंग यांनी ग्लोबल टाईम्सला सांगितलं.
पँगाँग लेकच्या उत्तर आणि दक्षिण या दोन्ही भागांमधून दोन्ही देशांचं सैन्य माघारी घेण्याची प्रक्रिया सुरू असतानाच चिनी सैन्याने गलवान झटापटीत मारले गेलेल्या सैनिकांविषयीची माहिती दिली आहे.
गेल्या वर्षीच्या मे महिन्यात या दोन्ही देशांमधल्या तणावाला सुरुवात झाल्यापासून या जागेबद्दल सगळ्यांत जास्त वाद झाले आहेत.

हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)









