अमेरिका-इस्रायल आणि इराण संघर्षामध्ये पिण्याचं पाणी महत्त्वाचं का?

इराणमधील महिला पाणी पिताना ( संग्रहित छायाचित्र, जुलै - 2025 )

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, इराणमधील महिला पाणी पिताना ( संग्रहित छायाचित्र, जुलै - 2025 )
    • Author, अमृता दुर्वे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

अमेरिका-इस्रायल आणि इराण संघर्षामध्ये जगाचं लक्ष क्रूड तेलावर आहे. आखाती देश जगाच्या एकूण क्रूड तेल पुरवठ्यापैकी सुमारे एक तृतीयांश पुरवठा करतात. क्रूड तेलावर या देशांची अर्थव्यवस्था चालते, आणि इथला क्रूड पुरवठा धोक्यात आला की जगभरातल्या कच्च्या तेलाच्या किमती वाढतात.

म्हणूनच तेल कंपन्या, तेल साठे एक महत्त्वाचं टार्गेट ठरतात. या संघर्षातल्या हल्ल्यानंतर तेहरानमधले तेल साठे एका पाठोपाठ पेटले.

पण दुसरीकडे या संघर्षातलं आणखीन एक तितकंच महत्त्वाचं टार्गेट आहे - पाणी. कारण ते या आखाती देशांकडे मर्यादित प्रमाणात आहे.

पाण्याचा पुरवठा करण्याच्या दृष्टीने इतर पर्यायांचा देखील विचार केला जातो. त्यापैकी डिसलाइनेशन करणे म्हणजे खारे पाणी क्षारमुक्त करून ते पिण्यायोग्य बनवणे. ही प्रक्रिया Desalination Plants मध्ये केली जाते.

Desalination Plants महत्त्वाचे का? आणि लष्करी संघर्षात हे पाणी महत्त्वाचं कसं आहे? जाणून घेऊयात.

गल्फ कोऑपरेशन कौन्सिल (GCC) च्या सदस्य देशांना म्हटलं आखाती देश. पर्शियाच्या आखातातले तेलसाठे असणारे हे देश आहेत.

या देशांमध्ये सौदी अरेबिया, कुवैत, युनायटेड अरब अमिराती, कतार, बहारीन आणि ओमान यांचा समावेश आहे.

1981 मध्ये या सुन्नी अरब देशांनी गल्फ कोऑपरेशन काऊन्सिलची स्थापना केली होती.

क्रूड तेलावर या देशांची अर्थव्यवस्था चालते, आणि इथला क्रूड पुरवठा धोक्यात आला की जगभरातल्या कच्च्या तेलाच्या किंमती वाढतात.

म्हणूनच तेल कंपन्या, तेल साठे एक महत्त्वाचं टार्गेट ठरतात. या संघर्षातल्या हल्ल्यानंतर तेहरानमधले तेल साठे धडाडून पेटले.

पण दुसरीकडे या संघर्षातलं आणखीन एक तितकंच महत्त्वाचं टार्गेट आहे, ते म्हणजे 'पाणी'. कारण या आखाती देशांकडे पाणी मर्यादित प्रमाणात आहे.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, U.S. Navy via Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

दरम्यान, इराणने आपल्या डिसॅलिनेशन प्लांट्स (Desalination Plant) वर हल्ला केल्याचं बहारीनने 8 मार्चला म्हटलं.

तर अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यात आपल्या डिसॅलिनेशन प्लांट्सचं नुकसान झाल्याचं इराणने त्याआधी म्हटलं होतं.

डिसॅलिनेशन प्लांट्स म्हणजे, खाऱ्या पाण्याचं गोड्या पाण्यात रूपांतर करणारे प्रकल्प. जिथे समुद्राच्या पाण्यातले क्षार काढण्याची प्रक्रिया करून त्याचं गोड्या पाण्यात - पिण्याच्या पाण्यात रूपांतर केलं जातं.

या प्रक्रियेला म्हणतात Reverse Osmosis. यामध्ये टेक्नॉलॉजीचा वापर करून समुद्राच्या पाण्यातून मीठ वेगळं केलं जातं.

हे अगदी आपल्या घरात असलेल्या RO purifier सारखं आहे. ज्याप्रमाणे RO प्युरिफायर पाणी स्वच्छ करून आपल्या वापरायोग्य बनवतं. अगदी त्याचप्रमाणे Reverse Osmosis काम करतं, पंरतु मोठ्या प्रमाणात.

आखाती देश पृथ्वीवर ज्या भागात आहेत, तो प्रदेश जगातल्या सर्वात शुष्क प्रदेशांपैकी एक आहे. पाऊस अनियमित आहे. गोड्या पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत अत्यंत मर्यादित आहेत.

सौदी अरेबिया आणि कुवैत या देशांनी 1938 पासून अशाप्रकारे गोडं पाणी मिळवायला सुरुवात केली.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त, 1

गल्फ रिसर्च सेंटरच्या माहितीनुसार जगातल्या एकूण डिसॅलिनेशन प्लांट्सपैकी 60 टक्के गल्फ कोऑपरेशन कौन्सिल (GCC) च्या सदस्य देशांमध्ये आहेत. 2023 पर्यंत या देशांत मिळून 400 असे प्रकल्प होते.

भूजल आणि डिसॅलिनेशन प्लांट्समधून मिळणारं पाणी याद्वारे आखाती प्रदेशांतला 90 टक्के पाणी पुरवठा होत असल्याचं गल्फ रिसर्च सेंटरच्या अहवालात म्हटलं आहे.

त्यामुळे हे देश खाऱ्या पाण्यापासून मिळवण्यात आलेल्या गोड्या पाण्यावर पूर्णपणे अवलंबून आहेत. याच पाण्यावर शहरं पोसतात, शेती, हॉटेल्स आणि इंडस्ट्रीज अवलंबून आहेत.

म्हणजे कुवैतमधलं 90 टक्के पिण्याचं पाणी या प्रकल्पांमधून येतं. ओमानमध्ये हे प्रमाण 86 टक्के आहे, सौदी अरेबियात 70 टक्के, तर युएईमध्ये 42 टक्के आहे.

आखाती देशांमधलं 90 टक्के अधिक डिसॅलिनेटेड वॉटर म्हणजे क्षार काढण्याची प्रक्रिया करण्यात आलेलं पाणी फक्त 56 प्लांट्समधून पुरवलं जातं असं 2010 साली अमेरिकेच्या CIA च्या अहवालात म्हटलं आहे.

(आखाती देश म्हणजे कोणते देश हे समजून घेण्यासाठी खालील व्हीडिओ पाहा.)

YouTube पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त, 2

पर्शियाच्या आखातात हे आखाती देश वसलेयत, आणि या पर्शियाच्या आखाताच्या किनारपट्टीवर शेकडो डिसॅलिनेशन प्लांट्स आहेत. आणि हे सगळे प्रकल्प इराणी क्षेपणास्त्रं किंवा ड्रोन्सच्या पल्ल्यात आहेत.

2 मार्चला इराण दुबईच्या Jebel Ali बंदरावर हल्ला केला. तिथपासून फक्त 12 मैलांवर जगातला सर्वात मोठा डिसॅलिनेशन प्लांट आहे. या प्रकल्पातूनच दुबईचा बहुतांश पाणीपुरवठा होतो.

आखाती देशांमधले अनेक डिसॅलिनेशन प्रकल्प हे ऊर्जा प्रकल्पांचा भाग आहेत. म्हणजे तिथे पाण्यापासून ऊर्जा निर्मितीही होते आणि खाऱ्यापासून गोड्या पाण्याची निर्मितीही केली जाते. त्यामुळेच या देशांच्या ऊर्जा संबंधित प्रकल्पावरचा हल्ला दुहेरी परिणाम करणारा ठरू शकतो.

संग्रहित

फोटो स्रोत, AFP via Getty Images

फोटो कॅप्शन, संग्रहित फोटो

एखाद्या मोठ्या डिसॅलिनेशन प्रकल्पावरच्या हल्ल्यामुळे प्लांट बंद पडला, तर काही शहरांना मिळणारं पाणी मोजक्या दिवसांत संपून जाईल.

आखाती देशांमध्ये यामुळे आणीबाणीची परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि पुन्हा प्रकल्प उभारून तो कार्यरत करायला वेळ लागणार असल्याने ही दीर्घकालीन समस्या ठरेल.

दरम्यानच्या काळात शेती, इंडस्ट्रीवर परिणाम होईल आणि अर्थातच या सगळ्यामुळे आर्थिक अनिश्चितताही निर्माण होईल.

1990-91 च्या आखाती युद्धादरम्यान इराकी सैन्याने मुद्दामून कुवैतच्या पाणी प्रकल्पांचं नुकसान केलं होतं. पर्शियाच्या आखातात इराकी सैन्याने लाखो बॅरल तेल सोडलं आणि परिणामी समुद्रातल्या Oil Spill सोबतच भूजलात हे तेल झिरपण्याचाही परिणाम झाला होता. याचे परिणाम दीर्घकाळ टिकले.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.