100 मीटर रेस, डिस्कस थ्रो आणि गोळा फेक यासारख्या खेळांमध्ये मेडल्स मिळवणाऱ्या 94 वर्षीय पानी देवी
100 मीटर रेस, डिस्कस थ्रो आणि गोळा फेक यासारख्या खेळांमध्ये मेडल्स मिळवणाऱ्या 94 वर्षीय पानी देवी
राजस्थानच्या बिकानेरमधील पानी देवी यांनी खेळाडू होण्याच्या स्वप्नाला आकार दिला. ना वयाची चिंता, ना थकवा येईल याची भीती, मनात फक्त काहीतरी वेगळं करण्याची जिद्द. नुकताच पानी देवींनी नोव्हेंबरमध्ये चेन्नईत पार पडलेल्या आशियाई मास्टर्स अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भाग घेतला होता. 90 ते 95 वयोगटात भाग घेणाऱ्या त्या एकमेव महिला स्पर्धक होत्या. तिथं त्यांनी 100 मीटर रेस, जॅव्हेलिन थ्रो आणि डिस्कस थ्रोमध्ये 3 गोल्ड मेडल्स पटकावली.
रिपोर्ट : कुमारी स्नेहा
शूट-एडिट : देबलिन रॉय
फिल्ड प्रोड्युसर : शिवालिका पुरी
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)



