पॅरालिम्पिक पदक जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय महिला डॉ. दीपा मलिक यांची मुलाखत
पॅरालिम्पिक पदक जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय महिला डॉ. दीपा मलिक यांची मुलाखत
डॉ. दीपा मलिक हे असं नाव आहे ज्यानं भारतीय खेळाचं स्वरूप बदलून टाकलं.
वयाच्या 29 व्या वर्षी पाठीच्या कण्यातील ट्यूमरचं निदान झालं आणि छातीपासून खाली अर्धांगवायू झाला, तरीही त्या खेळापासून दूर गेल्या नाहीत, त्यांनी खेळाची व्याख्याच बदलली.
त्या पॅरालिम्पिक पदक जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या, भारतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी अनेक पुरस्कार जिंकले आणि क्रीडा जगतात भरारी घेतली.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






