मुंबई विमानतळावर दोन विमानांचे पंख एकमेकांना घासले; नेमकं काय घडलं?
मुंबई विमानतळावर दोन विमानांचे पंख एकमेकांना घासले; नेमकं काय घडलं?
मुंबई विमानतळावर दोन विमानं जमिनीवरच एवढी जवळ आली, की त्यांचे पंख एकमेकांना घासले.
3 फेब्रुवारी 2026 रोजी संध्याकाळी साडेसात वाजता टॅक्सीवेवर म्हणजे विमानांना रनवेकडे घेऊन जाणाऱ्या मार्गावर ही दुर्घटना घडली. मात्र त्यात कोणीही दुखापतग्रस्त झालं नाही.
एयर इंडियाचं AI 2732 हे विमान मुंबईहून कोईंबतूरला जाण्यासाठी रनवेकडे जात होतं. त्याचवेळी हैदराबादहून मुंबईला आलेलं इंडिगोचं विमान शेजारच्या टॅक्सीवेवरूनच जात होतं.
एयरबस A320 प्रकारच्या या दोन्ही विमानांचे पंख एकमेकांना घासले आणि पंखांचं नुकसान झालं.
हा अपघात नेमका कशानं झाला, याची चौकशी डीजीसीएनं सुरू केली आहे.
पंखांच्या टकरीनंतर दोन्ही विमानांतील प्रवाशांना सुरक्षित उतरवण्यात आलं आणि विमानांची तापसणी करण्यात आली असं विमान कंपन्यांनी सांगितलं आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)



