सुरत रेल्वे स्टेशनवर इतकी गर्दी का झाली की पोलिसांनी लाठीमार केला?
सुरत रेल्वे स्टेशनवर इतकी गर्दी का झाली की पोलिसांनी लाठीमार केला?
गुजरातच्या सुरत शहरातील उधना रेल्वे स्टेशनवर उत्तर भारतातल्या राज्यांकडे जाणाऱ्या ट्रेन पकडण्यासाठी रविवारी 19 एप्रिलच्या सकाळी प्रवाशांची झुंबड उडाली, सर्वत्र गोंधळाचं वातावरण निर्माण झालं.
थोड्या वेळात गर्दीला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीमारही केला. या सगळ्या गैरसोयीमुळे महिला आणि लहान मुलांचे खासकरून प्रचंड हाल झाले.
काही प्रवाशांनी सांगितलं की त्यांना 2 किलोमीटरपेक्षा जास्त लांब रांगेत अन्न आणि पाण्याशिवाय 12 तासांपेक्षा जास्त काळ उभं राहावं लागलं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






