पुण्याच्या अडाचीवाडीतील अनोखी अभ्यासिका स्मशानात का भरते?

व्हीडिओ कॅप्शन, पुण्याच्या अडाचीवाडीतील अनोखी अभ्यासिका स्मशानात का भरते?
पुण्याच्या अडाचीवाडीतील अनोखी अभ्यासिका स्मशानात का भरते?

पुणे जिल्ह्यातील अडाचीवाडी या गावात दररोज सायंकाळी 7 ते 9 या वेळेत स्मशानभूमीत अभ्यासिका भरते. गावातील मुलं भोंगा वाजल्यानंतर तिथे जाऊन दोन तास अभ्यास करतात. घरातील टीव्ही, मोबाईल आणि गोंगाट यामुळे अभ्यासात अडचणी येत असल्याने ग्रामस्थांनी शांत जागेचा पर्याय निवडला.

या उपक्रमात निवृत्त शिक्षक मुलांना इंग्रजी, पाठांतर आणि शंका निरसनात मार्गदर्शन करतात. ग्रामपंचायतीच्या सदस्यांच्या मते, स्मशानाबाबत असलेली भीती आणि अंधश्रद्धा दूर करण्याचाही हा प्रयत्न आहे. सुरुवातीला पालक मुलांसोबत गेले आणि हळूहळू मुलांची भीती कमी झाली.

ग्रामस्थांच्या मते, मर्यादित उत्पन्नाच्या साधनांमध्ये पुढची पिढी शिक्षित होणं महत्त्वाचं आहे. पालक सांगतात की या उपक्रमामुळे मुलांचा मोबाईल वापर कमी झाला असून अभ्यासावर लक्ष केंद्रित होत आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या विचाराशी सुसंगत असा हा उपक्रम, ग्रामीण भागातील शिक्षण आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांची सांगड घालण्याचा प्रयत्न मानला जात आहे.

रिपोर्ट- प्राची कुलकर्णी

शूट- नितीन नगरकर

व्हीडिओ एडिट- अरविंद पारेकर

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरुमचे प्रकाशन.