नरसंहाराच्या काळात ज्यूंचं रक्षण करणारे 'अरब नायक' का राहिले इतिहासात दुर्लक्षित?

खालिद अब्दुल-वहाब हे दयाळू होते. पण 'रायचस अमंग द नेशन्स' (जगातील धर्मनिष्ठ) हा सन्मान देण्यासाठी ते पात्र ठरत नाहीत, असं इस्रायलच्या होलोकॉस्ट स्मृती केंद्राने म्हटलं आहे.

फोटो स्रोत, Family handout

फोटो कॅप्शन, खालिद अब्दुल-वहाब हे दयाळू होते. पण 'रायचस अमंग द नेशन्स' (जगातील धर्मनिष्ठ) हा सन्मान देण्यासाठी ते पात्र ठरत नाहीत, असं इस्रायलच्या होलोकॉस्ट स्मृती केंद्राने म्हटलं आहे.
    • Author, स्वामीनाथन नटराजन
    • Role, बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस
  • वाचन वेळ: 6 मिनिटे

इस्रायलच्या होलोकॉस्ट स्मृती केंद्रानं होलोकॉस्टच्या काळात ज्यूंचे प्राण वाचवण्यासाठी जीव धोक्यात घालणाऱ्या 28 हजारांहून अधिक गैर-ज्यू लोकांचा सन्मान केला आहे.

पण आजवर कोणत्याही अरब देशात ज्यूंचे प्राण वाचवणाऱ्या एकाही अरब व्यक्तीला 'रायचस' (नीतिमान) म्हणून मान्यता मिळालेली नाही.

"ट्युनिशियामध्ये एका अरब बेकरने दररोज बेकरीमागे जास्तीचं अन्न ठेवायला सुरुवात केली होती. ज्या ज्यू लोकांकडे रेशन कार्ड नाही, त्यांच्यासाठी त्यानं हे पाऊल उचललं होतं."

"अन्न आणि दूध मिळत नसल्यामुळं काही अरब महिला ज्यूंची बाळं घरी न्यायच्या आणि त्यांची काळजी घ्यायच्या. जणू त्या त्यांच्या आया किंवा परिचारिका बनल्या होत्या."

"अल्जिअर्समध्ये इस्लामी धर्मगुरूंनी जप्त केलेल्या ज्यू मालमत्तेची देखभाल स्थानिक मुस्लिमांनी करू नये असा फतवा काढला होता. हा फतवा जाहीर झाल्यानंतर तो मोडणारा एकही स्थानिक अरब व्यक्ती मला दिसून आला नाही."

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात उत्तर आफ्रिकेत ज्यू लोकांना मदत करणाऱ्या लोकांच्या काही कथा आहेत. अमेरिकेतील वॉशिंग्टन इन्स्टिट्यूटचे कार्यकारी संचालक डॉ. रॉब सॅटलॉफ यांनी या कथा संकलित केल्या आहेत.

सी अली सक्कत, खालिद अब्दुल-वहाब आणि हमजा अब्दुल जलील यांना योग्य तो सन्मान मिळायला हवा, असं डॉ. रॉब सॅटलॉफ म्हणतात.

फोटो स्रोत, Rob Satloff

फोटो कॅप्शन, सी अली सक्कत, खालिद अब्दुल-वहाब आणि हमजा अब्दुल जलील यांना योग्य तो सन्मान मिळायला हवा, असं डॉ. रॉब सॅटलॉफ म्हणतात.

नाझींनी युरोपमध्ये 60 लाखांहून अधिक ज्यूंची हत्या केली. तसंच फ्रान्समधील सहयोगवादी विची सरकारच्या मदतीने त्यांनी उत्तर आफ्रिकेतील ज्यू समुदायांवरही अत्याचार केले.

त्यामुळे अनेकांचा मृत्यू झाला, अनेकांना घरदार सोडावं लागलं आणि मालमत्ता गमवावी लागली. हे प्रमाण युरोपपेक्षा खूप कमी होतं.

"युरोपमध्ये ज्यूंबाबत जे काही घडलं, त्यात सामूहिक हत्या वगळता तसंच सगळं अरब देशांमधील ज्यूंनाही भोगावं लागलं," असं डॉ. सॅटलॉफ यांनी बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसला सांगितलं.

अमेरिकेच्या होलोकॉस्ट मेमोरियल म्युझियमनुसार मोरोक्को, अल्जेरिया, ट्युनिशिया आणि लिबियामध्ये सुमारे पाच लाख ज्यू राहत होते. सॅटलॉफ यांच्या अंदाजानुसार यापैकी 4 ते 5 हजार ज्यूंचा मृत्यू झाला होता.

'सगळं पणाला लावलं'

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

इस्रायलच्या होलोकॉस्ट स्मृती केंद्र (रिमेंबरन्स सेंटर) याद वाशेमकडून विशेषतः तीन अरब व्यक्तींना मान्यता मिळायला हवी होती, असं सॅटलॉफ यांना वाटतं.

ट्युनिशिया हा उत्तर आफ्रिकेतील एकमेव देश होता जो नोव्हेंबर 1942 ते मे 1943 या काळात पूर्णपणे नाझींच्या ताब्यात होता. या काळात ज्यू लोकांना पिवळा तारा परिधान करायला भाग पाडलं गेलं.

नाझींनी सर्व ज्यू पुरुषांना सक्तीनं कामासाठी हजर राहण्याचा आदेश दिला. तेव्हा, ट्युनिसमधील जोसेफ नाकॅश पळून जाण्यात यशस्वी झाला. एका अरब व्यक्तीने स्वतःचा जीव धोक्यात घालून त्याला आश्रय दिल्याचं त्यानं अनेक वर्षांनंतर सॅटलॉफ यांना सांगितलं.

"डिसेंबर 1942 मध्ये एसएसने तरुण ज्यू पुरुषांना पकडण्यासाठी मोठी मोहीम राबवली," असं सॅटलॉफ म्हणतात.

"जर तुम्ही त्यांच्यापासून एखाद्याला लपवत असाल आणि नंतर पकडले गेलात, तर तो भयंकर गुन्हा समजला जाई."

"नाकॅश पकड मोहिमेतून (राऊंड-अप) निसटला, जर्मन लोकांच्या तावडीत सापडू नये यासाठी पळून जाण्याचा तो प्रयत्न करत होता. शेवटी त्या परिसरातील हमाम (सार्वजनिक आंघोळीचे ठिकाण) मध्ये पोहोचला."

आजही ट्युनिशियामध्ये एक छोटा ज्यू समाज वास्तवास आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, आजही ट्युनिशियामध्ये एक छोटा ज्यू समाज वास्तवास आहे.

तिथला मालक हमजा अब्दुल जलील यांनी नाकॅशला तो त्याचे रक्षण करेल आणि त्याला तळघरात लपवून ठेवेल, असं सांगितलं.

"मी त्या नाकॅशला भेटलो, मग ट्युनिसला परत जाऊन ते हमाम शोधलं. तिथे मला नाकॅशला वाचवलेल्या मालकाचा मुलगा भेटला," असं सॅटलॉफ बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसला सांगतात.

"त्याला सगळे तपशील माहीत होते. ही एक चांगली गोष्ट होती."

ट्युनिसचे माजी महापौर, सी अली सक्कत यांनीही धोका पत्करुन ज्यू कामगार छावणीतून पळून आलेल्यांना काहींना आपल्या देशातील झाघौआन व्हॅलीतील घरात अन्न आणि आश्रय दिला. हे ठिकाण राजधानीपासून सुमारे 55 किमी दूर आहे.

'वाईट शक्तीला सामोरे गेले'

पण सॅटलॉफ यांना भावलेली गोष्ट खालिद अब्दुल-वहाबची आहे. एका नाझी अधिकाऱ्याने ट्युनिशियामधील त्याच्या माहितीतील एका ज्यू महिलेवर नजर ठेवली असल्याचं त्याला समजलं होतं.

मध्यरात्री, अब्दुल-वहाबने लपून बसलेल्या त्या ज्यू महिला आणि तिच्या कुटुंबाला वाचवलं. त्यांना ट्युनिसपासून सुमारे 30 किमी दूर आपल्या शेतात नेऊन गोठ्यात लपवलं.

पण ही फक्त सुरुवात होती, नाझींचा ताबा संपण्यापूर्वी, त्याने त्या कुटुंबातील पुरुषांना सक्तीच्या कामासाठी पाठवल्यानंतर 20 महिला आणि मुलांना लपवून ठेवले होतं.

त्यापैकी तीन ज्यूंनी नंतर याद वाशेमकडे अब्दुल-वहाबला सन्मान देण्याची विनंती केली. पण ही विनंती दोनदा नाकारण्यात आली.

बर्लिनमध्ये एका तरुण ज्यू महिलेला लपवलं आणि तिच्या कुटुंबाला मदत केलेले इजिप्शियन डॉ. मोहम्मद हेलमी हे एकमेव अरब आहेत, ज्यांना 'रायचस अमंग द नेशन्स' हा सन्मान मिळाला आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, बर्लिनमध्ये एका तरुण ज्यू महिलेला लपवलं आणि तिच्या कुटुंबाला मदत केलेले इजिप्शियन डॉ. मोहम्मद हेलमी हे एकमेव अरब आहेत, ज्यांना 'रायचस अमंग द नेशन्स' हा सन्मान मिळाला आहे.

केंद्राने सांगितलं की, अब्दुल-वहाब 'उदात्त व्यक्ती' होते आणि साक्षीदारांनी त्याचा दयाळुपणा सांगितला आहे. पण ज्यूंना आपल्याकडे ठेवणं कायदेशीर होतं आणि नाझींना याची पूर्ण कल्पना होती.

म्हणून त्यांना होलोकॉस्टमध्ये ज्यूंचे प्राण वाचवणाऱ्या गैर-ज्यू लोकांना दिला जाणारा 'रायचस अमंग द नेशन्स' हा सन्मान किंवा धार्मिक पदवी मिळालेली नाही.

"ट्युनिशियामध्ये जर्मन ताबा फक्त सहा महिन्यांसाठी होता, त्यामुळे तिथे नाझींची अंतिम उपाय अंमलात आणण्याची योजना कधीच पूर्ण झाली नाही," असं याद वाशेमने सांगितलं.

अब्दुल-वहाबकडे लपलेल्या इवा वेसेल यांनी डिसेंबर 2011 मध्ये, 13 वर्षांची असताना न्यूयॉर्क टाइम्समध्ये एक लेख लिहिला आणि त्या निर्णयामुळे त्या निराशा झाल्याचं म्हटलं होतं.

त्या म्हणाल्या, "मला दीर्घ आणि सुंदर आयुष्य जगता आलं. कारण अब्दुल-वहाब यांनी वाईट शक्तीला सामोरे जाऊन मला वाचवलं. त्यांनी माझ्या कुटुंबातील इतर भाग्यवान सदस्यांनाही वाचवलं. मला आशा आहे की, याद वाशेम त्याचा पुनर्विचार करतील, अन्यथा ही गोष्ट सांगणारं कोणी उरणार नाही."

'सोपी कथा'

'रायचस अमंग द नेशन्स' हा सन्मान मिळालेल्या 28 हजारपेक्षा जास्त लोकांमध्ये सुमारे 70 मुस्लीम आहेत. त्यापैकी फक्त एकच अरब आहे, इजिप्शियन डॉ. मोहम्मद हेलमी. त्यांनी बर्लिनमध्ये एका तरुण ज्यू महिलेला लपवलं आणि तिच्या कुटुंबाला मदत केली.

सॅटलॉफ यांच्या कथा खूप प्रभावी असल्या तरी, अमेरिकेतील मॅनहॅटन युनिव्हर्सिटीच्या होलोकॉस्ट, जेनोसाइड (नरसंहार) आणि इंटरफेथ एज्युकेशन सेंटरच्या संचालिका डॉ. मेहनाझ आफ्रिदी त्या 'सोपी कथा' म्हणणाऱ्या दृष्टीकोनाला विरोध करतात.

मोरोक्कोचा राजा मोहम्मद पाचवा यांने ज्यू विरोधी कायदे अंमलात आणण्याच्या मागण्या नाकारल्या.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मोरोक्कोचा राजा मोहम्मद पाचवा यांने ज्यू विरोधी कायदे अंमलात आणण्याच्या मागण्या नाकारल्या.

आफ्रिदी बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसला सांगतात, "इस्रायलमधील काही लोकांसाठी, अरब लोकांनी ज्यूंना वाचवलं हे मान्य करणं सध्याच्या राजकारणासाठी गुंतागुंतीचं ठरतं.

अरब जगात काही लोकांसाठी, ज्यूंना नाझींकडून बचावाची गरज होती हे मान्य करणं, होलोकॉस्ट नाकारण्याच्या आणि राजकारणासाठी वापरल्या जाणाऱ्या दृष्टिकोनांना धक्का देतं."

'होलोकॉस्टची सावली'

आफ्रिदी स्वतः मोरोक्कोच्या राजाला सन्मान देण्याची मागणी करत आहेत. त्या म्हणतात, "प्रो-नाझी म्हणजेच नाझी समर्थकांना विची सरकारच्या काळात, मोरोक्को आणि टँजिअर्सला ज्यूंना कामगार छावणीत ठेवण्याचे आदेश मिळाले होते.

मोरोक्कोचे राजे मोहम्मद पंचम यांनी ज्यू विरोधी कायदे लागू करण्याची किंवा मोरोक्कोतील ज्यूंना फ्रान्सला पाठवण्याची मागणी नाकारली."

याद वाशेमच्या वेबसाइटवर, होलोकॉस्ट स्टडीजच्या आंतरराष्ट्रीय शाळेचे माजी शिक्षक डॉ. जॅकी मेट्झगर लिहितात: "जर होलोकॉस्ट म्हणजे मोठ्या प्रमाणावर सामूहिक हत्या, तर उत्तर आफ्रिकेत होलोकॉस्ट झाला नाही. या काळात ज्यूंचा इतिहास होण्याची भीती होती पण प्रत्यक्षात ते घडलं नाही."

पण बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसला दिलेल्या लेखी उत्तरात, "उत्तर आफ्रिका हा होलोकॉस्टचा भाग आहे," हे केंद्राने मान्य केलं.

"नाझींनी उत्तर आफ्रिकेतील ज्यूंचं भाग्य युरोपमधील ज्यूंसारखाच निश्चित केलं होतं, तसेच पॅलेस्टाईन आणि मध्य पूर्वेतील ज्यूंसाठीही," असं त्यांनी सांगितलं.

"पोलंड स्वतंत्र झाल्यावर (1943 ऐवजी 1945) उत्तर आफ्रिका मुक्त झाली असती, तर बहुतेक ज्यू वाचले नसते."

 याद वाशेमने 28 हजारपेक्षा जास्त गैर-ज्यू लोकांना 'रायचस अमंग द नेशन्स' हा सन्मान दिला आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, याद वाशेमने 28 हजारपेक्षा जास्त गैर-ज्यू लोकांना 'रायचस अमंग द नेशन्स' हा सन्मान दिला आहे.

सर्व सन्मानासाठी मिळालेल्या अर्जांची काळजीपूर्वक तपासणी केली जाते, कोणत्याही पक्षपातीपणा किंवा पूर्वग्रहाशिवाय ही तपासणी केली जाते, असं त्यांनी सांगितलं. पण त्यांची मूल्यांकन समिती सध्या 'कोणत्याही अरब वाचकांच्या प्रकरणांवर चर्चा करत नाही' कारण नवीन अर्ज आलेले नाहीत.

आफ्रिदी म्हणतात की, अब्दुल-वहाबसारख्या कथा हळूहळू लोकांपर्यंत पोहोचत आहेत. त्या म्हणतात, "2009 मध्ये, त्याच्यासाठी वॉशिंग्टनमधील अडास इस्रायल गार्डन ऑफ द रायचस आणि मिलान, इटलीमधील गार्डन ऑफ द रायचस वर्ल्डवाइडमध्ये एक वृक्ष समर्पित केला गेला. त्यावेळी त्याची मुलगी फैजा तिथे उपस्थित होती."

सॅटलॉफ याच्याशी सहमत आहेत. ते म्हणतात, "उत्तर अमेरिका आणि युरोपमधील अनेक संघटना आणि संस्थांनी त्या काळात ज्यूंचे रक्षण केले, त्या अरब लोकांच्या धैर्य आणि साहसाला ओळख दिली, त्याचा मला खूप अभिमान आहे."

सॅटलॉफ यांना आशा आहे की, आणखी अधिक पुरावे मिळाल्यास भविष्यात अधिकृत सन्मानाची संधी मिळू शकते.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)