You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी, 'भारतात लोकशाही टिकणार नाही' असं का म्हटलं होतं?
"इथे (भारतात) लोकशाही काम करणार नाही, कारण इथली समाजव्यवस्था संसदीय लोकशाहीशी विसंगत आहे."
हा विचार कुणा अराजकवाद्याचा नसून भारतीय घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आहे. 1953 सालच्या जून महिन्यात बीबीसीला दिलेल्या स्फोटक मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं होतं.
'India's Challenge: Will The Democratic Experiment Succeed?' या विशेष मालिकेत बीबीसीने भारताच्या या नवजात लोकशाहीचा आढावा घेतला.
यात डॉ. आंबेडकरांशीही बातचीत करण्यात आली. बीबीसीचे ज्येष्ठ पत्रकार एडन क्रॉली यांनी ही मुलाखत घेतली होती.
(डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने ही मुलाखत पुन्हा याठिकाणी देत आहोत.)
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन