दिव्यांग असणाऱ्या बालाजी शिंदेंची इंग्लंडच्या ब्रिस्टॉल विद्यापीठात निवड कशी झाली?
दिव्यांग असणाऱ्या बालाजी शिंदेंची इंग्लंडच्या ब्रिस्टॉल विद्यापीठात निवड कशी झाली?
धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळी भागातील बालाजी शिंदे यांची ब्रिस्टॉल विद्यापीठात निवड झालीय. बालाजी एका पायाने दिव्यांग आहेत, दहावीत असताना त्यांना बोन कॅन्सरचं निदान झालं आणि त्यांचा एक पाय काढावा लागला.
अत्यंत हालाखीच्या परिस्थितीतून येऊन बालाजी यांनी उच्च शिक्षण घेतलंय. परदेशातून शिकून येऊन दिव्यांग व्यक्तींसाठी धोरणात्मक पातळीवर काम करायचं ध्येय बालाजीने समोर ठेवलंय. पाहा बीबीसी मराठीने केलेला हा खास रिपोर्ट
रिपोर्ट - रितेश साळवे
शूट - किरण साकळे
व्हीडिओ एडिट - अरविंद पारेकर
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






