'ट्रेड डील'वर ट्रम्प जे म्हणाले ते पंतप्रधान मोदी का बोलले नाही?

व्हीडिओ कॅप्शन, अमेरिकेने कमी केला भारतावरचा टॅरिफ, पण व्यापारी कराराबद्दल शंका कायम
'ट्रेड डील'वर ट्रम्प जे म्हणाले ते पंतप्रधान मोदी का बोलले नाही?

अमेरिकेने भारतातून आयात होणाऱ्या वस्तूंवरील टॅरिफ कमी केला असून, दोन्ही देशांमध्ये एक व्यापारी करार झाल्याचीही घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक्सवर पोस्ट करत टॅरिफ कमी झाल्याबद्दल आनंद व्यक्त केलाय, पण त्यांच्या पोस्टमध्ये व्यापार कराराबाबत कोणतीही माहिती नाही.

त्यामुळे काहींनी या करारांवर शंका व्यक्त केली आहे.

व्हीडिओ - गुलशनकुमार वनकर

एडिटिंग - राहुल रणसुभे

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)