भारताच्या इतिहासाची ओळख करून देणाऱ्या 12 खुर्च्या; या फोटोंमधून काय समजतं?

प्रदर्शनाचा भाग असलेल्या बेंटवुड खुर्चीचा स्टेज केलेला फोटो. बेंटवुड खुर्च्या 1850 च्या दशकात जर्मन-ऑस्ट्रियन कॅबिनेट निर्माता मायकेल थोनेट यांनी तयार केल्या होत्या. लाकडी दांड्यांना वाफवून त्यांना आवश्यक आकारात वाकवत या खुर्च्या बनवल्या जातात.

फोटो स्रोत, Hashim Badani

फोटो कॅप्शन, प्रदर्शनाचा भाग असलेल्या बेंटवुड खुर्चीचा स्टेज केलेला फोटो. बेंटवुड खुर्च्या 1850 च्या दशकात जर्मन-ऑस्ट्रियन कॅबिनेट निर्माता मायकेल थोनेट यांनी तयार केल्या होत्या. लाकडी दांड्यांना वाफवून त्यांना आवश्यक आकारात वाकवत या खुर्च्या बनवल्या जातात.
    • Author, शेरिलन मोलान
    • Reporting from, मुंबई
  • वाचन वेळ: 8 मिनिटे

मुंबईत नुकतंच एक आगळंवेगळं प्रदर्शन भरलं होतं. 'अ हिस्टरी ऑफ इंडिया थ्रू चेअर्स' म्हणजे 'खुर्च्यांमधून भारताचा इतिहास' असे शीर्षक असलेल्या या प्रदर्शनात तब्बल 200 हून अधिक खुर्च्या मांडण्यात आल्या होत्या.

या केवळ खुर्च्या नव्हत्या तर कोरीव काम आणि त्यांच्या खास आकारातील भारताचा शेकडो वर्षांचा सांस्कृतिक इतिहास होता.

'हाऊस ऑफ महेंद्र दोशी' या संस्थेने हे प्रदर्शन भरवलं होतं. आनंद गांधी आणि चिकी दोशी या दोन तज्ज्ञांनी गेल्या कित्येक वर्षांपासून भारताच्या कानाकोपऱ्यातून या खास खुर्च्या शोधून आणल्या आणि त्यांना पुन्हा मूळ वैभव मिळवून दिलं. त्यांच्या या संग्रहातून भारताचा इतिहास एका वेगळ्या रूपात समोर आला.

या खुर्च्यांची मांडणी अगदी जुन्या काळापासून ते आजच्या आधुनिक काळापर्यंत असा पट मांडणाऱ्या क्रमाने करण्यात आली होती. यामुळे पूर्वीच्या काळी लोक कसे बसायचे आणि काळानुसार ही पद्धत कशी बदलत गेली हे सहज समजून घेता येत होतं.

या प्रवासात जगभरातील विविध कलाप्रवाह भारतात कसे रुजले याची झलकही पाहायला मिळाली.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे या खुर्च्यांच्या रचनेतून 16 व्या ते 19 व्या शतकातील भारतावर झालेल्या परकीय आक्रमणांचा इतिहास समोर येतो.

डच, पोर्तुगीज, फ्रेंच आणि ब्रिटिश जेव्हा भारतात आले तेव्हा त्यांनी केवळ भौगोलिक प्रदेशच जिंकले नाहीत, तर त्यासोबतच त्यांनी त्यांच्या स्वत:च्या देशातील फर्निचरच्या पद्धती आणि नक्षीकामही आणले.

या खुर्च्यांच्या डिझाईनकडे पाहिलं की, त्या त्या देशांच्या संस्कृतीचा प्रभाव आपल्याला स्पष्टपणे दिसून येतो.

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

थोडक्यात सांगायचं तर या प्रदर्शनाने दाखवून दिलं की, एखादी साधी खुर्ची सुद्धा आपल्या देशातील सत्तासंघर्ष आणि सामाजिक बदलांची साक्षीदार असू शकते.

या प्रदर्शनाचे सह-क्यूरेटर विवेक गांधी सांगतात, "जेव्हा डच, पोर्तुगीज, फ्रेंच आणि ब्रिटिश भारतात आले, तेव्हा त्यांनी केवळ स्वतःचं फर्निचरच सोबत आणलं नाही, तर भारतीय कारागिरांना त्यांच्या आवडीच्या पाश्चात्य पद्धतीच्या खुर्च्या बनवण्याची कामंही दिली. त्यांना सवयीच्या युरोपीय डिझाईन्सच्या खुर्च्या इथं भारतीय कारागिरांच्या हातून तयार होऊ लागल्या."

याचाच परिणाम असा झाला की, भारतात आज अशा खुर्च्यांचा असा खजिना पाहायला मिळतो, ज्या पूर्णपणे पाश्चात्य धाटणीच्या आहेत किंवा ज्यामध्ये भारतीय आणि पाश्चात्य कलाकुसरीचा एक सुंदर मिलाफ झाला आहे.

'हाऊस ऑफ महेंद्र दोशी' या संस्थेने आणि आनंद गांधी व चिकी दोशी या तज्ज्ञांनी गेल्या अनेक दशकांपासून हा मौल्यवान वारसा जतन करून जगासमोर मांडला आहे.

पण हा इतिहास जपणं सोपं नव्हतं. गेल्या अनेक दशकांपासून या खुर्च्या अडगळीत, जुन्या फर्निचरच्या दुकानांत किंवा खासगी संग्रहात धूळ खात पडल्या होत्या.

जेव्हा या खुर्च्या आनंद गांधी आणि विवेक गांधी यांच्याकडे येतात तेव्हा त्यांची अवस्था अतिशय बिकट असते. कधी पाय तुटलेले असतात तर कधी गाद्या फाटलेल्या.

कसबी कारागिरांच्या मदतीने एका एका खुर्चीवर महिनोमहिने काम करून तिला तिचं जुनं वैभव मिळवून दिलं जातं.

या संग्रहातील एक अतिशय खास खुर्ची म्हणजे गुजरातच्या एका जुन्या लिलावातून मिळालेली सिरामिकच्या मण्यांनी सजवलेली खुर्ची. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण फक्त या एका खुर्चीला तिचं मूळ रूप देण्यासाठी तब्बल 8 महिने लागले होते.

या संग्रहातील आणखी एक आकर्षणाचं केंद्र म्हणजे ले कॉर्ब्युझियर (Le Corbusier) या जगप्रसिद्ध स्विस-फ्रेंच वास्तुविशारदाने डिझाइन केलेली एक दुर्मिळ 'लाउंज चेअर'.

1950 च्या दशकात भारताचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी चंदीगड शहराच्या रचनेसाठी ले कॉर्ब्युझियर यांना निमंत्रित केले होते तेव्हाचा हा वारसा आहे.

यासोबतच एकेकाळी पोर्तुगीजांची वसाहत असलेल्या गोव्यातून आणलेल्या 19 व्या शतकातील 'अँग्लो-पोर्तुगीज' शैलीतील खुर्च्यांनीही लोकांचे लक्ष वेधून घेतले.

हे प्रदर्शन केवळ डिझाइन्सपुरते मर्यादित नव्हते, तर त्यात भारताच्या समृद्ध वनसंपत्तीचे दर्शनही घडले. सागवान, शिसम (Rosewood) आणि एबोनी यांसारख्या उच्च दर्जाच्या भारतीय लाकडांचा वापर आणि त्यावर स्थानिक कारागिरांनी हाताने केलेले अत्यंत बारीक कोरीव काम या प्रदर्शनामुळे जगासमोर आले.

पिढ्यानपिढ्या चालत आलेली ही हस्तकलेची परंपरा पाहून आजचे प्रेक्षकही थक्क झाले.

प्रदर्शनातील काही खास खुर्च्यांची ही झलक:

इंग्लंडमधील लोकप्रिय असलेली ही 17 व्या शतकातील 'कॅरोलियन' शैलीतील खुर्ची भारतातील एका जुन्या फर्निचरच्या दुकानात सापडली होती. बहुधा एखाद्या ब्रिटिश अधिकाऱ्याने ही वापरली असावी असा अंदाज आहे. या खुर्चीवर अतिशय बारीक कोरीव काम आणि सोन्याच्या धाग्यांनी केलेले भरतकाम पाहायला मिळते.

फोटो स्रोत, Vivek Gandhi

फोटो कॅप्शन, इंग्लंडमधील लोकप्रिय असलेली ही 17 व्या शतकातील 'कॅरोलियन' शैलीतील खुर्ची भारतातील एका जुन्या फर्निचरच्या दुकानात सापडली होती. बहुधा एखाद्या ब्रिटिश अधिकाऱ्याने ही वापरली असावी असा अंदाज आहे. या खुर्चीवर अतिशय बारीक कोरीव काम आणि सोन्याच्या धाग्यांनी केलेले भरतकाम पाहायला मिळते.
बर्गंडी म्हणजे गडद जांभळट लाल रंग आणि सोनेरी अशा राजेशाही रंगाची ही भव्य 'अँग्लो-इंडियन' शैलीतील सागवानी खुर्ची म्हणजे जणू सत्तेचे प्रतीक. अशा प्रकारच्या 'सिंहासनरूपी' खुर्च्या (Throne chairs) परंपरेने सत्ता अधिकार आणि मोठेपणा दर्शवण्यासाठी वापरल्या जातात. त्यावर सहसा सम्राट किंवा धर्मगुरू विराजमान व्हायचे. विवेक गांधी यांच्या मते, 19 व्या शतकातील भारतात ही खुर्ची कदाचित एखाद्या बड्या ब्रिटिश अधिकाऱ्याच्या वापरात असावी.

फोटो स्रोत, Vivek Gandhi

फोटो कॅप्शन, बर्गंडी म्हणजे गडद जांभळट लाल रंग आणि सोनेरी अशा राजेशाही रंगाची ही भव्य 'अँग्लो-इंडियन' शैलीतील सागवानी खुर्ची म्हणजे जणू सत्तेचे प्रतीक. अशा प्रकारच्या 'सिंहासनरूपी' खुर्च्या (Throne chairs) परंपरेने सत्ता अधिकार आणि मोठेपणा दर्शवण्यासाठी वापरल्या जातात. त्यावर सहसा सम्राट किंवा धर्मगुरू विराजमान व्हायचे. विवेक गांधी यांच्या मते, 19 व्या शतकातील भारतात ही खुर्ची कदाचित एखाद्या बड्या ब्रिटिश अधिकाऱ्याच्या वापरात असावी.
जेव्हा तुम्ही या खुर्चीच्या बॅकरेस्ट म्हणजे पाठीचा भाग बारकाईने पाहता तेव्हा त्यावर एक राजेशाही मुकुटाची आकृती दिसते. विशेष म्हणजे यावर अत्यंत सुबक असे 'झरदोजी' काम करण्यात आले आहे. झरदोजी ही सोन्या-चांदीच्या धाग्यांनी केली जाणारी भरतकामाची एक कला आहे जी मुघल काळात भारतात प्रचंड बहरली होती. भारतीय हातांनी विणलेली ही कला आणि पाश्चात्य डिझाईन यांचा हा एक अप्रतिम नमुना आहे.

फोटो स्रोत, Cherylann Mollan

फोटो कॅप्शन, जेव्हा तुम्ही या खुर्चीच्या बॅकरेस्ट म्हणजे पाठीचा भाग बारकाईने पाहता तेव्हा त्यावर एक राजेशाही मुकुटाची आकृती दिसते. विशेष म्हणजे यावर अत्यंत सुबक असे 'झरदोजी' काम करण्यात आले आहे. झरदोजी ही सोन्या-चांदीच्या धाग्यांनी केली जाणारी भरतकामाची एक कला आहे जी मुघल काळात भारतात प्रचंड बहरली होती. भारतीय हातांनी विणलेली ही कला आणि पाश्चात्य डिझाईन यांचा हा एक अप्रतिम नमुना आहे.
गुजरातच्या राजेशाही थाटाची साक्ष देणारी ही 'दरबार खुर्ची' खरोखरच पाहण्यासारखी आहे. 19 व्या शतकातील पश्चिम गुजरातमधील एका राजाच्या दरबारात ही खुर्ची डौलाने विराजमान असायची.

फोटो स्रोत, Vivek Gandhi

फोटो कॅप्शन, गुजरातच्या राजेशाही थाटाची साक्ष देणारी ही 'दरबार खुर्ची' खरोखरच पाहण्यासारखी आहे. 19 व्या शतकातील पश्चिम गुजरातमधील एका राजाच्या दरबारात ही खुर्ची डौलाने विराजमान असायची.
या खुर्चीचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे तिच्या मागील बाजूला असलेली नावाची पाटी (Plaque). या पाटीवर ही खुर्ची तयार करणाऱ्या कारागिराचे नाव आणि ती कोणत्या महिन्यात व कोणत्या वर्षी बनवली, याची स्पष्ट नोंद आहे.

फोटो स्रोत, Vivek Gandhi

फोटो कॅप्शन, या खुर्चीचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे तिच्या मागील बाजूला असलेली नावाची पाटी (Plaque). या पाटीवर ही खुर्ची तयार करणाऱ्या कारागिराचे नाव आणि ती कोणत्या महिन्यात व कोणत्या वर्षी बनवली, याची स्पष्ट नोंद आहे.
18 व्या शतकातील 'इंडो-पोर्तुगीज' शैलीतील ही एक 'बिशप' खुर्ची. विवेक गांधी सांगतात की, सुरुवातीच्या काळात एखादे कॅथोलिक बिशप ही खुर्ची वापरत असावेत, पण काळ बदलला आणि पुढे याच ऐतिहासिक खुर्चीचा वापर चक्क भारतीय सरकारी कार्यालयात केला जाऊ लागला.

फोटो स्रोत, Vivek Gandhi

फोटो कॅप्शन, 18 व्या शतकातील 'इंडो-पोर्तुगीज' शैलीतील ही एक 'बिशप' खुर्ची. विवेक गांधी सांगतात की, सुरुवातीच्या काळात एखादे कॅथोलिक बिशप ही खुर्ची वापरत असावेत, पण काळ बदलला आणि पुढे याच ऐतिहासिक खुर्चीचा वापर चक्क भारतीय सरकारी कार्यालयात केला जाऊ लागला.
या खुर्चीच्या 'बॅकरेस्ट'कडे म्हणजे पाठीकडील भाग बारकाईने पाहिल्यावर तिथे लाकडावर कोरलेली एक अशोक मुद्रा दिसते. विशेष म्हणजे यासाठी वेगळ्या रंगाचे लाकूड वापरण्यात आले आहे. यावरून असे स्पष्ट होते की, ही अशोक मुद्रा खुर्चीच्या मूळ डिझाइनचा भाग नव्हती, तर ती नंतरच्या काळात तिथे बसवण्यात आली.

फोटो स्रोत, Cherylann Mollan

फोटो कॅप्शन, या खुर्चीच्या 'बॅकरेस्ट'कडे म्हणजे पाठीकडील भाग बारकाईने पाहिल्यावर तिथे लाकडावर कोरलेली एक अशोक मुद्रा दिसते. विशेष म्हणजे यासाठी वेगळ्या रंगाचे लाकूड वापरण्यात आले आहे. यावरून असे स्पष्ट होते की, ही अशोक मुद्रा खुर्चीच्या मूळ डिझाइनचा भाग नव्हती, तर ती नंतरच्या काळात तिथे बसवण्यात आली.
यातील समोरच्या बाजूला दिसणारी खुर्ची जगप्रसिद्ध वास्तूविशारद ले कॉर्ब्युझियर यांनी डिझाईन केलेली आहे. तर उजवीकडे वरच्या बाजूला आहे ती 'हार्प चेअर' (Harp Chair). ही खुर्ची जॉर्गन होवेल्स्कोव्ह यांनी 1960 च्या दशकात डेन्मार्कमध्ये डिझाईन केली होती. विशेष म्हणजे ही खुर्ची तयार करण्यासाठी त्यांना 'वायकिंग्स'च्या (Viking ships) जहाजांपासून प्रेरणा मिळाली होती.

फोटो स्रोत, Vivek Gandhi

फोटो कॅप्शन, यातील समोरच्या बाजूला दिसणारी खुर्ची जगप्रसिद्ध वास्तूविशारद ले कॉर्ब्युझियर यांनी डिझाईन केलेली आहे. तर उजवीकडे वरच्या बाजूला आहे ती 'हार्प चेअर' (Harp Chair). ही खुर्ची जॉर्गन होवेल्स्कोव्ह यांनी 1960 च्या दशकात डेन्मार्कमध्ये डिझाईन केली होती. विशेष म्हणजे ही खुर्ची तयार करण्यासाठी त्यांना 'वायकिंग्स'च्या (Viking ships) जहाजांपासून प्रेरणा मिळाली होती.
गुजरातच्या काठियावाडमधील रंगीबेरंगी सिरामिकच्या मण्यांपासून अत्यंत बारीक नक्षीकाम करून ही खुर्ची सजवण्यात आली आहे. या खुर्चीचं महत्त्व इतकं आहे की, तिला तिच्या जुन्या वैभवात परत आणण्यासाठी तब्बल 8 महिने लागले. विवेक गांधी यांच्या मते, ही देखणी खुर्ची कदाचित त्या काळातील एखाद्या स्थानिक सरदाराची असावी.

फोटो स्रोत, Vivek Gandhi

फोटो कॅप्शन, गुजरातच्या काठियावाडमधील रंगीबेरंगी सिरामिकच्या मण्यांपासून अत्यंत बारीक नक्षीकाम करून ही खुर्ची सजवण्यात आली आहे. या खुर्चीचं महत्त्व इतकं आहे की, तिला तिच्या जुन्या वैभवात परत आणण्यासाठी तब्बल 8 महिने लागले. विवेक गांधी यांच्या मते, ही देखणी खुर्ची कदाचित त्या काळातील एखाद्या स्थानिक सरदाराची असावी.
पारंपारिकपणे ही खुर्ची नेदरलँडमधील शहरांच्या महापौरांसाठी वापरली जात असे. पुढे 17 व्या ते 19 व्या शतकाच्या दरम्यान इंडोनेशिया, श्रीलंका आणि भारतासारख्या डच वसाहतींमध्ये ही शैली प्रचंड लोकप्रिय झाली. या खुर्चीची रचना खूपच वेगळी असते. यात बसण्याची जागा वेताची असे, बॅकरेस्ट वक्राकार असे आणि महत्त्वाचं म्हणजे याला 6 ते 8 पाय असतात.

फोटो स्रोत, Vivek Gandhi

फोटो कॅप्शन, पारंपारिकपणे ही खुर्ची नेदरलँडमधील शहरांच्या महापौरांसाठी वापरली जात असे. पुढे 17 व्या ते 19 व्या शतकाच्या दरम्यान इंडोनेशिया, श्रीलंका आणि भारतासारख्या डच वसाहतींमध्ये ही शैली प्रचंड लोकप्रिय झाली. या खुर्चीची रचना खूपच वेगळी आहे. यात बसण्याची जागा वेताची असे, बॅकरेस्ट वक्राकार असे आणि महत्त्वाचं म्हणजे याला 6 ते 8 पाय असतात.
या खुर्चीचं सर्वात मोठं गुपित म्हणजे हिच्या हातांच्या खाली असलेले 'गुप्त' कप्पे. 1930 च्या दशकात भारतात 'आर्ट डेको' चळवळ कमालीची लोकप्रिय झाली होती. त्या काळातील इमारती आणि सजावटीमध्ये एक प्रकारचा आधुनिक डौल, उठावदार रंग, प्रमाणबद्ध आकार आणि स्टायलिश नक्षीकाम पाहायला मिळायचं. ही खुर्ची त्याच आधुनिक आणि वेगवान युगाची साक्ष देते.

फोटो स्रोत, Vivek Gandhi

फोटो कॅप्शन, या खुर्चीचं सर्वात मोठं गुपित म्हणजे हिच्या हातांच्या खाली असलेले 'गुप्त' कप्पे. 1930 च्या दशकात भारतात 'आर्ट डेको' चळवळ कमालीची लोकप्रिय झाली होती. त्या काळातील इमारती आणि सजावटीमध्ये एक प्रकारचा आधुनिक डौल, उठावदार रंग, प्रमाणबद्ध आकार आणि स्टायलिश नक्षीकाम पाहायला मिळायचं. ही खुर्ची त्याच आधुनिक आणि वेगवान युगाची साक्ष देते.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)