भारत समजून घेण्यासाठी फोटोग्राफीनं ब्रिटिशांना कशी मदत केली? पाहा 19 व्या शतकातील दुर्मिळ फोटो

ब्रिटिश साम्राज्याला भारताचं वर्गीकरण करण्यास फोटोग्राफीची मदत कशी झाली, 19 व्या शतकातील भारताचे दुर्मिळ फोटो

फोटो स्रोत, DAG

    • Author, सुधा जी. टिळक
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

एकोणीसाव्या शतकाचा उत्तरार्ध. भारतावर एव्हाना ब्रिटिशांनी जम बसवला होता. मात्र, तरीही भारत जाणून घेण्यासाठी ब्रिटिशांचे प्रयत्न सुरुच होते. त्यासाठी एक कला त्यांना सर्वाधिक मदतीची ठरली, ती म्हणजे फोटोग्राफी.

दिल्लीतील DAG या आर्ट गॅलरीनं 'टाईपकास्टिंग : फोटोग्राफिंग द पीपल्स ऑफ इंडिया, 1855-1920' नावाचं एक प्रदर्शन आयोजित केलं आहे.

या प्रदर्शनात एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील एका विशिष्ट कालखंडातील जवळपास 200 दुर्मिळ फोटो मांडण्यात आले आहेत.

भारतातील समुदायांचं वर्गीकरण करण्यासाठी, त्यांची ओळख निश्चित करण्यासाठी आणि गुंतागुंतीचे सामाजिक फरक समजून घेण्यासाठी ब्रिटिशांनी कॅमेऱ्याचा वापर केला होता.

या प्रदर्शनात 65 वर्षांच्या काळातील फोटो मांडण्यात आले असून त्यात भारतातील विविध समुदाय आणि लोकांचं विस्तृत वैविध्य त्यातून समोर येतं.

यात ईशान्य भारतातील नेप्चा आणि भुतिया समुदायांपासून ते वायव्य भागातील आफ्रिदींपर्यंत, तसंच निलगिरीतील तोडा ते पारसी आणि पश्चिम भारतातील उच्चभ्रूंपर्यंत भारतातील विविध समुदायांचं चित्रण दिसून येतं.

यात ब्रिटिशांच्या वसाहतवादी समाज व्यवस्थेत सर्वात खालच्या पायऱ्यांवर असलेल्या लोकांकडेही लक्ष वेधण्यात आलं आहे. त्यात नृत्य करणाऱ्या मुली, शेतमजूर आणि गारुड्यांचा समावेश आहे.

भारताच्या वैविध्याचं दस्ताऐवजीकरण ते फोटोग्राफीला दिलेली दिशा

या फोटोंमधून फक्त भारताच्या विविधतेचं दस्तऐवजीकरण झालं नाही, तर या फोटोंनी त्याला सक्रियपणे आकार दिला. त्यांनी प्रवाही, जिवंत वास्तवांना स्पष्टपणे स्थिर आणि ज्ञात 'प्रकारां'मध्ये रुपांतरित केलं.

इतिहासकार सुदेशना गुहा यांनी या प्रदर्शनातील फोटोंची काळजीपूर्वक निवड केली आहे. हे प्रदर्शन 1868 ते 1875 दरम्यान प्रकाशित झालेल्या 'द पीपल ऑफ इंडिया' या 8 खंडांच्या फोटोग्राफिक सर्वेक्षणातील पानांवर केंद्रित आहे.

मुंबईत (तेव्हाचं बॉम्बे) गाईच्या शेणाऱ्या गोवऱ्या घेऊन जाणाऱ्या महिलांचा 1890 चा एडवर्ड टॉरिन्स यांनी काढलेला फोटो. महिला घरकाम करत असताना, सामान्यपणे घरात केली जाणारी कामं करत असताना या फोटोत दाखवलं आहे. कॅमेऱ्यासाठी ते सर्व पुन्हा बाहेर ठेवण्यात आलं आहे.

फोटो स्रोत, DAG

फोटो कॅप्शन, मुंबईत (तेव्हाचं बॉम्बे) गाईच्या शेणाच्या गोवऱ्या घेऊन जाणाऱ्या महिलांचा 1890 चा एडवर्ड टॉरिन्स यांनी काढलेला फोटो. महिला घरकाम करत असताना, सामान्यपणे घरात केली जाणारी कामं करत असताना या फोटोत दाखवलं आहे. कॅमेऱ्यासाठी ते सर्व पुन्हा बाहेर ठेवण्यात आलं आहे.

या प्रदर्शनाचा विस्तार या मध्यवर्ती कल्पना किंवा गाभ्यापासून ते सॅम्युअल बॉर्न, लाला दीन दयाल, जॉन बर्क आणि शेफर्ड अँड रॉबर्टसन या स्टुडिओच्या अल्बुमेन आणि सिल्व्हर-जिलेटिन प्रिंट फोटोंपर्यंत होतो. या फोटोग्राफर्सच्या फोटोंनी त्या काळतील दृश्य भाषेची व्याख्या करण्यास मदत केली.

"एकत्रितपणे, हे फोटो, साहित्य लोकसमूहशास्त्रीय (एथनोग्राफिक) म्हणजे समुदायांचा अभ्यास करणाऱ्या फोटोग्राफीचा इतिहास सांगतं. त्याचबरोबर त्याचा ब्रिटिश प्रशासन आणि भारतीय लोकांवर झालेल्या परिणामांबद्दलही सांगतं. या आकाराचा आणि खोलीचा प्रकल्प भारतात यापूर्वी कधीही पाहिला गेला नव्हता," असं डीएनजीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष आनंद म्हणाले.

DAG च्या प्रदर्शनातील निवडक फोटो :

भारतीय महिलेचा हा फोटो 1890 साली फेलिक्स मोरन यांनी काढलेला आहे, या प्रदर्शनातील फोटोंमध्ये महिला प्रामुख्यानं दिसतात. वसाहतवादी काळात काढण्यात आलेल्या या फोटोमध्ये त्या काळातील लोकसमूहशास्त्रीय दृष्टी आणि सुरुवातीच्या पोटोग्राफीमधील औपचारिक भव्यता दोन्हीही टिपण्यात आलं आहे.

फोटो स्रोत, DAG

फोटो कॅप्शन, भारतीय महिलेचा हा फोटो 1890 साली फेलिक्स मोरन यांनी काढलेला आहे, या प्रदर्शनातील फोटोंमध्ये महिला प्रामुख्यानं दिसतात. वसाहतवादी काळात काढण्यात आलेल्या या फोटोमध्ये त्या काळातील लोकसमूहशास्त्रीय दृष्टी आणि सुरुवातीच्या पोटोग्राफीमधील औपचारिक भव्यता दोन्हीही टिपण्यात आलं आहे.
'खैबर खिंडीतील आफ्रिंदींचा गट' हा फोटो 1862 साली चार्लस शेफर्ड यांनी काढलेला आहे. यात ब्रिटिशांनी 'अत्यंत स्वतंत्र वृत्तीचे' म्हणून वर्णन केलेल्या पठाण जमातीतील पुरुष अफगाण सीमेवर दिसत आहेत.

फोटो स्रोत, DAG

फोटो कॅप्शन, 'खैबर खिंडीतील आफ्रिंदींचा गट' हा फोटो 1862 साली चार्लस शेफर्ड यांनी काढलेला आहे. यात ब्रिटिशांनी 'अत्यंत स्वतंत्र वृत्तीचे' म्हणून वर्णन केलेल्या पठाण जमातीतील पुरुष अफगाण सीमेवर दिसत आहेत.
एका अज्ञात फोटोग्राफरनं रस्त्यावरच्या एका नाभिकाचा काढलेला हा फोटो आहे. अशा फोटोंमध्ये अनेकदा रस्त्यावरील व्यवहार, व्यापार आणि दैनंदिन कामकाज टिपलं जात असे, त्यामुळे सामान्य कामगारांचं रुपांतर समुदायांच्या अभ्यासाच्या विषयांमध्ये किंवा गोष्टींमध्ये होत असे.

फोटो स्रोत, DAG

फोटो कॅप्शन, एका अज्ञात फोटोग्राफरनं रस्त्यावरच्या एका नाभिकाचा काढलेला हा फोटो आहे. अशा फोटोंमध्ये अनेकदा रस्त्यावरील व्यवहार, व्यापार आणि दैनंदिन कामकाज टिपलं जात असे, त्यामुळे सामान्य कामगारांचं रुपांतर समुदायांच्या अभ्यासाच्या विषयांमध्ये किंवा गोष्टींमध्ये होत असे.
फोटोग्राफिक सोसायटी ऑफ बॉम्बेचे संस्थापक सदस्य विल्यम जॉन्सन यांनी 1857 च्या द इंडियन ॲमेच्युअर्स फोटोग्राफिक अल्बममध्ये 'ब्राह्मणी लेडीज' नावानं हा फोटो प्रकाशित केला होता, त्यासोबतच्या मजकूरात दोन्ही महिलांचं नाव देण्यात आलं होतं. तसंच त्यांचं वर्णन तरुण आणि बुद्धिमान असं करण्यात आलं होतं आणि त्या त्यांच्या वडिलांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे आणि पतींच्या पाठिंब्यानं मुंबईत मिशन स्कूलमध्ये इंग्रजी शिकण्यासाठी आल्या होत्या, असं त्यात नमूद करण्यात आलं होतं.

फोटो स्रोत, DAG

फोटो कॅप्शन, फोटोग्राफिक सोसायटी ऑफ बॉम्बेचे संस्थापक सदस्य विल्यम जॉन्सन यांनी 1857 च्या द इंडियन ॲमेच्युअर्स फोटोग्राफिक अल्बममध्ये 'ब्राह्मणी लेडीज' नावानं हा फोटो प्रकाशित केला होता, त्यासोबतच्या मजकूरात दोन्ही महिलांचं नाव देण्यात आलं होतं. तसंच त्यांचं वर्णन तरुण आणि बुद्धिमान असं करण्यात आलं होतं आणि त्या त्यांच्या वडिलांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे आणि पतींच्या पाठिंब्यानं मुंबईत मिशन स्कूलमध्ये इंग्रजी शिकण्यासाठी आल्या होत्या, असं त्यात नमूद करण्यात आलं होतं.
या फोटोंमध्ये पारशी लोकांचा एक गट वसाहतकालीन बंगल्यासमोर बसलेला दिसत असून तो कदाचित विल्यम जॉन्सन यांनी काढलेला आहे. त्यातून वसाहतकालीन वास्तुकलेचं जग व्यापताना त्यांचे पोशाख आणि त्यांच्या बसण्याच्या पद्धतीवरून त्यांची वेगळी ओळख दिसून येते आहे

फोटो स्रोत, DAG

फोटो कॅप्शन, या फोटोंमध्ये पारशी लोकांचा एक गट वसाहतकालीन बंगल्यासमोर बसलेला दिसत असून तो कदाचित विल्यम जॉन्सन यांनी काढलेला आहे. त्यातून वसाहतकालीन वास्तुकलेचं जग व्यापताना त्यांचे पोशाख आणि त्यांच्या बसण्याच्या पद्धतीवरून त्यांची वेगळी ओळख दिसून येते आहे
1890 सालचा तरुण भुतियांचा एक गट दिसत असून या खंडात सिक्कीम, भूतान आणि तिबेटमधील लोकांचे फोटो आहेत. या प्रदेशांवर ब्रिटिशांची राजवट नव्हती. लेप्चा, भुतिया आणि तिबेटी लोकांचा हा फोटो बेंजामिन सिम्पसन यांनी काढला होता.

फोटो स्रोत, DAG

फोटो कॅप्शन, 1890 सालचा तरुण भुतियांचा एक गट दिसत असून या खंडात सिक्कीम, भूतान आणि तिबेटमधील लोकांचे फोटो आहेत. या प्रदेशांवर ब्रिटिशांची राजवट नव्हती. लेप्चा, भुतिया आणि तिबेटी लोकांचा हा फोटो बेंजामिन सिम्पसन यांनी काढला होता.
महाराष्ट्रातील प्राचीन बौद्ध दगडी कोरीवकाम असलेल्या देवळात वेगवेगळी वाद्य वाजवणारे वादक या फोटोमध्ये दिसत आहेत. या फोटोवर तारीख नसून तो चार्लस स्कॉट यांनी काढलेला आहे.

फोटो स्रोत, DAG

फोटो कॅप्शन, महाराष्ट्रातील प्राचीन बौद्ध दगडी कोरीवकाम असलेल्या देवळात वेगवेगळी वाद्य वाजवणारे वादक या फोटोमध्ये दिसत आहेत. या फोटोवर तारीख नसून तो चार्लस स्कॉट यांनी काढलेला आहे.
19 व्या शतकाच्या उत्तरार्धात सिंगापूरमधील एक भारतीय कुटुंब. काही फोटोंमध्ये मलय द्वीपकल्प, सिंगापूर आणि बांगलादेशातील चितगावमधील लोकांचं चित्रण आहे.

फोटो स्रोत, DAG

फोटो कॅप्शन, 19 व्या शतकाच्या उत्तरार्धात सिंगापूरमधील एक भारतीय कुटुंब. काही फोटोंमध्ये मलय द्वीपकल्प, सिंगापूर आणि बांगलादेशातील चितगावमधील लोकांचं चित्रण आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)