You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
गावागावात रातोरात पुतळे उभे करण्यामागे काय आहे राजकारण?
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात रातोरात अनधिकृत पुतळे उभे करण्याची मालिका सुरू आहे.
सोलापुरातील अंजनगाव खेलोबा आणि मोहोळ, बुलढाण्यातील चिखला, परभणीतील बोरी, बीडमधील गेवराई, यवतमाळ शहर, सांगली शहर, सोलापुरातील मोडनिंब या गावामध्येही अशाच प्रकारे अनधिकृत पुतळा रातोरात बसवण्यात आला आहे.
अर्थातच, परवानगी नसताना अशा प्रकारे रातोरात पुतळे बसवण्यात आल्याने वादाची, विटंबनेची आणि सामाजिक सलोखा बिघडण्याची तलवार सतत प्रशासनावर टांगती आहे.
मात्र, अशाप्रकारे ठिकठिकाणी रातोरात पुतळे का उभे केले जात आहेत? यामागे नक्की काय राजकारण आहे? अशा अनधिकृत पुतळ्याच्या राजकारणाचे काय परिणाम होऊ शकतात, याचा घेतलेला हा धांडोळा...
रिपोर्ट - विनायक होगाडे
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.