You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शक्तिपीठ महामार्गासाठी जमीन मोजणीवरून परभणीत पोलीस आणि शेतकरी भिडले
शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी परभणीत शासकीय कर्मचारी पोहोचलेले असताना शेतकरी आणि कर्मचाऱ्यांमध्ये संघर्ष पाहायला मिळाला.
बंदोबस्तावरच्या पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना मारहाण केल्याचे स्थानिकांचे आरोप आहेत, पोलीस प्रशासनाने अद्याप याबाबत प्रतिक्रिया दिलेली नाही.
802 किलोमीटर अंतराचा वर्ध्यातल्या पवनारपासून पत्रादेवीपर्यंत जाणारा शक्तिपीठ महामार्ग हा 6 लेनचा हायवे सरकारने प्रस्तावित केला आहे.
12 जिल्ह्यातून जाणाऱ्या या महामार्गाची चर्चा मुळात सुरु झाली ती 2014 पासून. मात्र, तेव्हा पर्यावरणाच्या ऱ्हासाचा मुद्दा चर्चेत आला आणि हा प्रस्ताव बरगळला. पण 28 फेब्रुवारी 2024 ला सरकारने अधिसूचना काढली आणि त्यात शक्तीपीठ द्रुतगती महामार्गासाठी कोणत्या जमिनी जाणार आहेत, याची गावे आणि गट नंबरनुसार यादी जाहीर केली.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरुमचे प्रकाशन.