LPG गॅस सिलेंडर बुक करण्याची प्रक्रिया अशी बदलली, 'हे' आहेत नवीन नियम

तुमच्या घरीसुद्धा गॅस सिलेंडर येत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी नक्कीच कामाची आहे.
असं कधी झालं आहे का तुम्ही बुक केलेलं सिलेंडर दुसऱ्याच कुणाच्या घरी डिलिव्हर झालं? किंवा तुम्ही ऑनलाईन भरणा केला आहे, मात्र तुम्हाला सिलेंडर वेळेत कधी मिळत नाही? अशाच काही समस्यांचं समाधान शोधण्याचा प्रयत्न सध्या देशातल्या इंधन कंपन्या करत आहेत.
आजवर तुम्ही घरगुती गॅस सिलेंडरसाठी जशी बुकिंग करत होता, यापुढेही त्याच पद्धतीने फोनवरूनच बुकिंग करावं लागणार आहे. मात्र आता ही पद्धत सुरक्षित करण्यासाठी नवीन नियम लागू करण्यात आले आहेत.
1 नोव्हेंबरपासून तुम्ही फोनवरून गॅस बुकिंग केल्यानंतर तुम्हाला एक OTP म्हणजेच एक one time password येईल. याला Delivery Authentication Code अर्थात DAC म्हटलं जाईल.
जेव्हा तुमच्या घरी सिलेंडर डिलेव्हरीसाठी एखादी व्यक्ती येईल, तेव्हा तुम्हाला त्या व्यक्तीला तो DAC सांगावा लागेल.
ती व्यक्ती मग तुम्ही सांगितलेला OTP सिस्टमसोबत तपासून पाहणार, आणि जर दोन्हीचा ताळमेळ बसला तरच तुमची गॅस डिलेव्हरी यशस्वी होईल.
मात्र जर तुम्ही किंवा ज्या फोनवरून तुम्ही सिलेंडर बुक केलं आहे, तो घरी नसेल तर मात्र घरच्यांची थोडी तारांबळ उडू शकते. त्यामुळे यापुढे गॅस सिलेंडर घेताना जरा प्लॅनिंग करावं लागेल. आधीच गॅस बुकिंग कन्फर्म झाल्याचा मेसेज घरातील इतरांनाही पाठवून ठेवावा लागेल.
तसंच तुमचा फोन नंबर तुमच्या सिलेंडर कनेक्शन अकाऊंटशी व्यवस्थित जोडला गेला आहे, याचीसुद्धा खात्री करून घ्या.
इंडेनने बदलला बुकिंग नंबर
याशिवाय, आणखी एक महत्त्वाचा बदल 1 नोव्हेंबर पासून होतोय. तो म्हणजे इंडेन या कंपनीने आपला गॅस बुकिंग नंबर आता देशभरात एकच ठेवला आहे. तो नंबर आहे - 77189 55555
या नंबरवर तुम्ही आता SMS किंवा कॉल करून आपलं इंडेन कंपनीचं सिलेंडर मागवू शकता.
हेही नक्की वाचा -
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)








