पहिल्यांदा कच्चं तेल सापडलं आणि जग कसं बदललं? असा आहे तेलाचा इतिहास

पहिल्यांदा कच्चं तेल सापडलं आणि जग कसं बदललं? असा आहे तेलाचा इतिहास

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अमेरिकन नागरिक एडविन ड्रेक यांनी 1859 मध्ये जगात पहिल्यांदा कच्च्या तेलाचं उत्खनन केलं होतं, आज अमेरिका जगातील सर्वात मोठ्या तेल उत्पादक देशांपैकी एक आहे. (प्रातिनिधिक छायाचित्र)
    • Author, टिम हरफोर्ड
    • Role, बीबीसी
  • वाचन वेळ: 6 मिनिटे

ते 1859 साल होतं आणि दिवस होता 27 ऑगस्ट. अमेरिकेतील एक व्यापारी एडविन ड्रेक यांना एक संदेश आला. तो वाचून त्यांचा राग अनावर झाला. त्या संदेशात लिहिलं होतं, "तुमचं कर्ज फेडा, हार माना आणि घरी जा."

ड्रेक 'रॉक ऑईल'चा शोध घेत होते. हे एक प्रकारचं तपकिरी रंगाचं कच्चे तेल असतं. पश्चिम पेनसिल्व्हेनियातील जमिनीवर या तेलाचे बुडबुडे आढळले होते.

ड्रेक यांचा हेतू या 'रॉक ऑईल'मधून केरोसिन (रॉकेल) काढण्याचा होता. जेणेकरून त्याचा वापर करून लॅम्प म्हणजे दिवा लावता येईल.

त्या काळी लॅम्प लावण्यासाठी व्हेलमधून काढल्या जाणाऱ्या तेलाचा वापर व्हायचा. हे तेल हळूहळू महाग होत चाललं होतं.

अर्थात हा संदेश मिळण्याच्या काही काळ आधीच एका उत्खननाच्या दरम्यान कच्चे तेल सापडलं होतं. जेव्हा हे तेल बाहेर काढण्यात आलं, तेव्हा त्याचा दबाव इतका प्रचंड होता की जमिनीपासून 21 मीटर उंचीपर्यंत कारंजे उडाले होते.

या घटनेमुळे व्हेल माशांचा जीव वाचवला आणि जग बदलण्यास सुरुवात झाली.

कच्च्या तेलाचा शोध लागल्यावर वर्षभरानं

ड्रेक यांना ज्या ठिकाणी हे कच्चे तेल सापडलं होतं, तिथून काही किलोमीटर दक्षिणेला ज्या गोष्टी घडल्या, त्यानंतर वर्षांमध्ये संकेत मिळाले की आगामी काळात काय होणार आहे.

न्यूयॉर्क टाइम्समधील एका वृत्तानुसार, 1864 मध्ये पेनसिल्व्हेनियातील पिटहोल सिटीमध्ये जेव्हा कच्च्या तेलाचा शोध लागला, तेव्हा तिथे कित्येक किलोमीटरच्या परिघात 50 जण देखील राहत नव्हते.

मात्र कच्च्या तेलाचा शोध लागल्यानंतर वर्षभराच्या आतच पिटहोल सिटीमध्ये 10 हजार लोक राहू लागले. तिथे 50 हॉटेल, देशातील सर्वात व्यग्र पोस्ट ऑफिसपैकी एक पोस्ट ऑफिस, दोन टेलिग्राम सेंटर आणि अनेक वेश्यावस्त्याही सुरू झाल्या.

कच्च्या तेलाच्या किमतीचा परिणाम संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर होतो

फोटो स्रोत, AFP via Getty Images

फोटो कॅप्शन, कच्च्या तेलाच्या किमतीचा परिणाम संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर होतो

बदलत्या परिस्थितीत तिथले काही जण श्रीमंत झाले. मात्र पिटहोल सिटी एका खऱ्या अर्थव्यवस्थेसाठी आवश्यक असलेल्या इतर अटींची पूर्तता करत नव्हतं. त्यामुळे पिटहोलची चमक वर्षभरात कमी झाली.

कच्च्या तेलावर अवलंबून असलेली पिटहोलची अर्थव्यवस्था मजबूत होऊ शकली नाही. मात्र कच्च्या तेलासाठीची तहान आणखी वाढतच गेली.

जगाची ऊर्जेची गरज

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

आता तर परिस्थिती अशी झाली आहे की असं म्हणता येईल की जागतिक अर्थव्यवस्था कच्च्या तेलावर चालते. जगातील ऊर्जेची एक तृतियांश मागणी कच्च्या तेलाद्वारे पूर्ण होते.

ही कोळशापेक्षा अधिक मागणी आहे. तसंच आण्विक, जलविद्युत आणि बिगर पारंपारिक ऊर्जा स्त्रोतांच्या संयुक्त क्षमतेच्या दुप्पट आहे.

कच्चे तेल आणि नैसर्गिक वायू, आपल्या विजेच्या आवश्यकतेची एक चतुर्थांश मागणी पूर्ण करतात. इतकंच नाही तर, प्लास्टिक उद्योगासाठी यातून कच्चा मालदेखील मिळतो.

याव्यतिरिक्त ट्रान्सपोर्टदेखील आहे. एडविन ड्रेक यांना वाटलं होतं की गॅसोलिन कोण विकत घेईल? मात्र कम्बशन इंजिनमुळे त्यांच्या या प्रश्नाचं उत्तर मिळालं.

कार ते ट्रक, मालवाहू जहाजापासून ते जेट विमानापर्यंत, कच्चे तेलच आपलं जग चालवत आहे.

कच्च्या तेलाची किंमत ही बहुधा जगातील सर्वात महत्त्वाची किंवा मौल्यवान किंमत आहे, यात कोणतंही आश्चर्य नाही.

काही अरब देशांनी 1973 मध्ये जेव्हा काही समृद्ध किंवा श्रीमंत देशांना कच्च्या तेलाची विक्री करणं थांबवत असल्याचं जाहीर केलं होतं. त्यावेळेस फक्त 6 महिन्यांच्या आतच कच्च्या तेलाची किंमत 3 डॉलर प्रति बॅरलवरून 12 डॉलर प्रति बॅरल पोहचली होती.

या घटनेनंतर जगभरात आर्थिक मंदीचं वातावरण तयार झालं होतं. तसंच 1978, 1990 आणि 2001 मध्ये कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्यानंतर अमेरिकेत मंदी आली होती.

अँग्लो-फ्रेंच तेल कंपनी

फोटो स्रोत, AFP via Getty Images

फोटो कॅप्शन, 1909 मध्ये अँग्लो-फ्रेंच तेल कंपनीच्या एक भागात संप झाला होता

काही अर्थतज्ज्ञांना असंही वाटतं की 2008 मधील जागतिक मंदीचं कारण कच्च्या तेलाच्या किंमतीत झालेली विक्रमी वाढ होती. अर्थात या मंदीसाठी बँकिंग संकटाला जबाबदार ठरवण्यात आलं होतं.

जसजसं कच्च्या तेलाची किंमत वाढते, अर्थव्यवस्थादेखील तोच मार्ग अवलंबतात.

मात्र यातून प्रश्न निर्माण होतो की आपण या गोष्टीवर इतकं अवलंबून का झालो आहोत. कच्च्या तेलाच्या इतिहासावरील डॅनियल येरगिन यांच्या 'द प्राईज' या पुस्तकाची सुरुवात विन्स्टन चर्चिल यांच्या एका द्विधा स्थितीने किंवा कोंडीतून होते.

चर्चिल यांना 1911 मध्ये रॉयल नेव्ही (युकेचं शाही नौदल) चं प्रमुख करण्यात आलं होतं.

हा सुरुवातीच्या अशा काही निर्णयांपैकी एक होता, ज्यातून हे समजणार होतं की ब्रिटिश साम्राज्य वेल्शचा कोळसा, सुरक्षित आश्रयस्थानं किंवा दूरवरच्या फारस (आजचा इराण)च्या कच्च्या तेलावर चालणाऱ्या युद्धनौकांच्या आधारे विस्तारवादी जर्मनीच्या आव्हानाचा सामना करू शकेल की नाही?

अशा असुरक्षित स्त्रोतांच्या भरवशावर कोणी का राहील? कारण तेलावर चालणाऱ्या युद्धनौका घाईघाईनं बांधण्यात आल्या होत्या. इंधनावर चालत असल्यामुळे यामध्ये कमी लोकांची देखील आवश्यकता होती. त्याचबरोबर युद्धनौकेत शस्त्रास्त्रं आणि दारूगोळा ठेवण्याची अधिक क्षमता होती.

कच्चं तेल हे कोळशापेक्षा अधिक चांगलं इंधन

एप्रिल 1912 मध्ये चर्चिल यांच्या निर्णयामध्ये तेलावरील अवलंबित्वाच्या त्याच युक्तिवादाचं प्रतिबिंब उमटलं की तेलावर आपण अवलंबून आहोत आणि तेव्हापासून या गोष्टीनं जागतिक राजकारणाला आकार दिला आहे.

चर्चिल यांच्या निर्णयानंतर, ब्रिटिश ट्रेझरीनं अँग्लो-पर्शियन ऑईल कंपनीत सर्वात जास्त (मेजोरिटी) भागीदारी विकत घेतली. ही कंपनी बीपी (मूळची ब्रिटिश पेट्रोलियम) ची पूर्ववती म्हणजे आधीची कंपनी होती.

इराण सरकारनं 1951 मध्ये तेल कंपनीचं राष्ट्रीयीकरण केलं. मात्र 'ही आमची कंपनी आहे' असं म्हणत इंग्रजांनी त्याला विरोध केला. त्यावर इराणी लोकांनी उत्तर दिलं की 'हे आमचं तेल आहे'. नंतरच्या दशकांमध्ये संपूर्ण जगभरात याच युक्तिवादाची पुनरावृत्ती झाली.

सौदी अरेबिया

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, सौदी अरेबिया जगातील सर्वात श्रीमंत देशांपैकी एक आहे (प्रातिनिधिक फोटो)

कच्च्या तेलाच्या आधारे काही देशांनी खूप संपत्ती कमावली. सौदी अरेबिया जगातील सर्वात श्रीमंत देशांपैकी एक आहे. यासाठी त्या देशातील कच्च्या तेलाचे मोठे साठे कारणीभूत आहेत.

सौदी अरामको ही सौदी अरेबियातील सरकारी तेल कंपनी आहे. या कंपनीचं बाजारमूल्य ॲपल, गुगल किंवा ॲमेझॉनपेक्षा अधिक आहे.

सौदी अरामको, जगातील सर्वात नफा कमावणारी किंवा फायदेशीर तेल कंपनी आहे. या कंपनीला अलीकडेच 'ड्रोन' हल्ल्यांद्वारे लक्ष्य करण्यात आलं होतं. (या घटनेमुळे तेलाच्या किंमती गगनाला भिडू शकतात)

तरीदेखील कोणताही देश सौदी अरेबियाच्या विकसित अर्थव्यवस्थेला जपान किंवा जर्मनीच्या अर्थव्यवस्थांसारखी आधुनिक अर्थव्यवस्था मानणार नाही. कदाचित ती एका मोठ्या स्वरुपात पिटहोलप्रमाणेच थोडी अधिक आहे.

इतर ठिकाणी इराकपासून इराणपर्यंत आणि व्हेनेझुएलापासून नायजेरियापर्यंत, काही कच्च्या तेलानं समृद्ध असलेल्या देशांनी तेलाच्या आधारे प्रगती केली होती. अर्थतज्ज्ञ याला 'तेलाचा शाप' असं म्हणतात.

यावर 1960 च्या दशकाच्या सुरुवातीला व्हेनेझुएलाचे पेट्रोलियम मंत्री जुआन पाब्लो पेरेज अल्फोंजो यांनी केलेलं वर्णन अधिक स्पष्ट स्वरुपाचं होतं. त्यांनी 1975 मध्ये "ही सैतानाची विष्ठा आहे", असं म्हटलं होतं. तसंच ते म्हणाले होते, "आपण सैतानाच्या विष्ठेत बुडत आहोत."

कच्च्या तेलाबाबत समस्या काय आहेत?

कच्च्या तेलाची निर्यात केल्यावर त्या देशाच्या चलनाचं मूल्य वाढतं. यामुळे त्या देशात तेलाव्यतिरिक्त इतर सर्व गोष्टींचं उत्पादन महाग होऊ शकतं.

याचा अर्थ आहे की मॅन्युफॅक्चरिंग किंवा गुंतागुतींचं सेवा क्षेत्र विकसित करणं कठीण होऊ शकतं.

ऐतिहासिकदृष्ट्या अनेक राजकारण्यांनी त्यांच्या देशातील तेलावर स्वत:ची आणि त्यांच्या सहकाऱ्यांची मक्तेदारी आणण्याचा प्रयत्न केला आहे. हुकुमशाही ही काही असामान्य गोष्ट नाही. पैसा काही गोष्टींसाठी असतो, मात्र त्यामुळे अर्थव्यवस्था कमकुवत होते.

याच कारणामुळे आपण तेलाऐवजी दुसरं काहीतरी वापरण्याची आशा करतो. हवामान बदल ही स्पष्टपणे आणखी एक समस्या आहे.

मात्र अद्याप बॅटरीची जागा कच्च्या तेलानं व्यापलेली आहे. कारण चालणाऱ्या यंत्रांना स्वत:चा ऊर्जा स्त्रोत आवश्यक असतो आणि तो जितका हलका तितकं चांगलं.

तेल

फोटो स्रोत, Getty Images

एखाद्या 60 किलोग्रॅम बॅटरीमध्ये जितक्या प्रमाणात ऊर्जा असते, तितकीच उर्जा 1 किलोग्रॅम गॅसोलिनमध्ये असते. तसंच वापरानंतर गायब होण्याचं सुविधाजनक वैशिष्ट्यं त्यात असतं. दुर्दैवानं रिकाम्या बॅटऱ्या खूपच जड असतात.

इलेक्ट्रिक कार अखेरीस खराब होऊ लागतात. इलेक्ट्रिक जंबो प्लेन आणखी कठीण आव्हान बनलं आहे.

एक वेळ अशी होती की वाटत होतं की कच्च्या तेलाची किंमत नियंत्रणाबाहेर जाईल. याला 'पीक ऑईल' असं म्हटलं जायचं. यामुळे किमतींमध्ये झपाट्यानं वाढ झाली. त्यातून आपल्याला स्वच्छ आणि पर्यावरणपूरक (रिन्युएबल) अर्थव्यवस्थेच्या दिशेनं वाटचाल करण्यासाठी प्रेरणा मिळाली.

मात्र प्रत्यक्षात, आज कच्च्या तेलाचा जितका शोध लागला आहे. त्याच्या तुलनेत त्याचा वापर खूप अधिक आहे.

हे काही प्रमाणात हायड्रॉलिक फ्रॅक्चरिंग किंवा 'फ्रॅकिंग'च्या जलद वाढीमुळे आहे. ही एक वादग्रस्त प्रक्रिया आहे. यात कच्चे तेल आणि नैसर्गिक वायू बाहेर काढण्यासाठी पाणी, वाळू आणि रसायनांना उच्च दाबाखाली जमिनीखाली पंप केलं जातं.

असं वाटतं की आपण अजूनही 'सैतानाच्या विष्ठेत' बुडत आहेत. काही काळ हे असंच सुरू राहू शकतं.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.