सोपी गोष्ट : अमेरिका-इस्रायल आणि इराण संघर्षामध्ये पिण्याचं पाणी महत्त्वाचं का?

व्हीडिओ कॅप्शन, सोपी गोष्ट : अमेरिका - इस्रायल आणि इराण संघर्षामध्ये पिण्याचं पाणी महत्त्वाचं का?
सोपी गोष्ट : अमेरिका-इस्रायल आणि इराण संघर्षामध्ये पिण्याचं पाणी महत्त्वाचं का?

अमेरिका - इस्रायल आणि इराण संघर्षामध्ये जगाचं लक्ष क्रूड तेलावर आहे. आखाती देश जगाच्या एकूण क्रूड तेल पुरवठ्यापैकी सुमारे एक तृतीयांश पुरवठा करतात. क्रूड तेलावर या देशांची अर्थव्यवस्था चालते, आणि इथला क्रूड पुरवठा धोक्यात आला की जगभरातल्या कच्च्या तेलाच्या किमती वाढतात.

म्हणूनच तेल कंपन्या, तेल साठे एक महत्त्वाचं टार्गेट ठरतात. या संघर्षातल्या हल्ल्यानंतर तेहरानमधले तेल साठे धडाडून पेटले.

पण दुसरीकडे या संघर्षातलं आणखीन एक तितकंच महत्त्वाचं टार्गेट आहे - पाणी. कारण ते या आखाती देशांकडे मर्यादित प्रमाणात आहे.

Desalination Plants महत्त्वाचे का? आणि लष्करी संघर्षात हे पाणी महत्त्वाचं कसं आहे?

समजून घेऊ सोपी गोष्टमध्ये

लेखन आणि निवेदन - अमृता दुर्वे

एडिटिंग - निलेश भोसले

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)