इराणचे संरक्षण प्रमुख अली लारिजानी यांचा हल्ल्यात मृत्यू; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांचा दावा
इराणचे संरक्षण प्रमुख अली लारिजानी यांचा हल्ल्यात मृत्यू; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांचा दावा
इराणच्या सर्वोच्च नॅशनल सिक्युरिटी कौन्सिलचे सचिव अली लारिजानी यांचा मृत्यू झाल्याचा, दावा इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी केला आहे.
इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांनी त्यांच्या वक्तवात म्हटलं आहे की रात्रभर चाललेल्या इस्रायलच्या हल्ल्यांनंतर इराणचे सर्वोच्च सुरक्षा अधिकारी मारले गेल्याची माहिती त्यांना देण्यात आली आहे.
शुक्रवारी (13 मार्च) तेहरानमध्ये कुड्स डे च्या मोर्चात लारिजानी दिसले होते.
अर्थात, लारिजानी मारले गेले आहेत किंवा जखमी झाले आहेत याबद्दल इराणनं अद्याप माहिती दिली नाही.
इस्रायलच्या प्रसारमाध्यमांमधील बातम्यांमध्ये दावा करण्यात आला आहे की अली लारिजानी आणि त्यांचा मुलगा एका अपार्टमेंटमध्ये लपलेले होते. तिथे त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






