You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'दीक्षितचं पार्थिव येतंय का सांगा, नसेल तरी सांगा, आम्ही आमचे विधी उरकू'
'दीक्षितचं पार्थिव येतंय का सांगा, नसेल तरी सांगा, आम्ही आमचे विधी उरकू'
अमेरिका–इराण युद्धादरम्यान ओमानच्या आखातात जहाजावर झालेल्या हल्ल्यात मुंबईच्या कांदिवलीतील 33 वर्षीय दीक्षित सोलंकी यांचा 1 मार्चला मृत्यू झाला. ते MKD व्योम या तेल टँकरवर ऑइलर खलाशी म्हणून कार्यरत होते.
मात्र घटनेला 12 दिवस उलटूनही त्यांचं पार्थिव भारतात आणलेलं नाही. दीक्षित यांचा मृत्यू नेमका कसा झाला, तिथे नेमकं काय घडलं, याची माहितीसुद्धा ना कंपनी ना प्रशासनाकडून त्यांना मिळालेली आहे.
यामुळे सोलंकी कुटुंबाने कंपनी आणि शोध मोहिमेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
रिपोर्ट: अल्पेश करकरे
शूट : शार्दुल कदम
एडिट : मयुरेश वायंगणकर
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)