You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पुण्यात इंद्रायणी नदीवरचा पूल कोसळला; दोघांचा मृत्यू
पुण्यात इंद्रायणी नदीवरचा पूल कोसळला; दोघांचा मृत्यू
पुण्यात मावळ तालुक्यात कुंडमळा या ठिकाणी इंद्रायणी नदीवरचा पूल कोसळल्यानं मोठी दुर्घटना घडल्याची माहिती समोर येत आहे.
या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून 32 जखमी आहेत. त्यापैकी 6 जणांची प्रकृती गंभीर आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाने (NDRF) म्हटले आहे की आतापर्यंत 38 जणांना वाचवण्यात पथकाला यश मिळाले आहे आणि बचावकार्य अद्याप सुरू आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)