You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अशोक खरातची सुरुवात कशी झाली? तो इथपर्यंत कसा पोहोचला?
धार्मिक विधीच्या नावाखाली महिलांचं लैंगिक शोषण केल्याच्या आरोपांखाली अशोक खरात यास अटक करण्यात आलीय.
अशोक खरातविरोधात लैंगिक अत्याचार तसेच महाराष्ट्र नरबळी आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत 5 स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आलेत. या प्रकरणाचा पुढील तपास SIT म्हणजेच विशेष तपास पथक करत आहे.
अंकशास्त्रातून अशोक खरात लोकांना त्यांचे भविष्य सांगण्याचा दावा अशोक खरात करत असे, असा आरोप त्याच्यावर आहे.
अशोक खरातच्या भक्तांमध्ये क्लास वन अधिकाऱ्यांपासून, राजकारणी, उद्योजक, डॉक्टर असे हायप्रोफाईल लोक असल्याचं स्थानिक कार्यकर्ते सांगतात.
पण, अशोक खरातची सुरुवात कशी झाली आणि तो इथपर्यंत कसा पोहोचला, यावर प्रकाश टाकणारा बीबीसी मराठीचा हा ग्राऊंड रिपोर्ट.
रिपोर्ट – श्रीकांत बंगाळे
कॅमेरा – किरण साकळे
एडिट – अरविंद पारेकर
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)