AI, कृष्णविवरं आणि भारतातील विज्ञान : सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ अतिश दाभोलकर यांच्याशी बातचीत

AI, कृष्णविवरं आणि भारतातील विज्ञान : सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ अतिश दाभोलकर यांच्याशी बातचीत

कृष्णविवरांसारख्या विषयांवर काम करणारे अतिश दाभोलकर एक नावाजलेले सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ आहेत. त्यांनी स्ट्रिंग थियरी आणि क्वांटम ग्रॅव्हिटीसारख्या संकल्पनांवरही काम केलं आहे.

तसंच अतिश इंटरनॅशनल सेंटर फॉर थिऑरिटिकल फिजिक्स (ICTP) या इटलीतील संस्थेचे संचालकही आहेत. पाकिस्तानी नोबेल विजेते संशोधक अब्दुस सलाम यांनी या संस्थेची स्थापना केली होती.अतिश आता तिथेच काम करत आहेत.

भारतातल्या विज्ञान आणि संशोधनाविषयी अतिश यांना काय वाटतं? कृष्णविवरांची रचना कशी होत? AI सारख्या गोष्टींचा विज्ञानावर किती परिणाम होईल? ICTP मध्ये कामाचा अनुभव कसा आहे? या आणि अशा अनेक प्रश्नांवर अतिश यांना बोलतं केलं आहे बीबीसी मराठीच्या प्रतिनिधी जान्हवी मुळे यांनी.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)