You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
इराण इस्रायल युद्धामुळे दुबई, अबु धाबी सारखी जागतिक शहरं सुरक्षित राहिली नाहीयेत का?
आखाती देशांमधल्या सुरक्षित आणि पर्यटकांमध्ये लोकप्रिय अशा शहरांमध्येही धूर निघताना दिसलोय. फक्त दुबईच नाही तर दोहा, रियाथ, अबुधाबी, मस्कतमध्येही हल्ले होताना दिसतायत, विमानं, ड्रोन्स पडतायत.
खरंतर या युद्धात आखाती देशांना उतरायचं नव्हतं. पण इराणने त्यांच्याकडच्या अमेरिकन तळांना, कॉन्सुलेट्सना लक्ष्य केलंय. आखातातल्या सौदी अरोमकोच्या सर्वांत मोठ्या रिफायनरीचंही मोठं नुकसान झालंय.
या अरब राष्ट्रांनी हे युद्ध होऊ नये, यासाठी प्रयत्न केले होते. पण या हल्ल्यांमुळे सर्व लाल रेषा ओलांडण्यात आल्या आहेत, असं कतारने म्हटलंय. पण आता दुबईला जाणं सुरक्षित नाही राहिलंय का? आखाती देश इच्छा नसतानाही या युद्धात कसे ओढले गेले? पाहा हा व्हीडिओ.
वार्तांकन – बार्बरा प्लेट-अशर, इफ्तिकार खान, गुलशनकुमार वनकर
लेखन आणि निवेदन - गुलशनकुमार वनकर
एडिटिंग – मयुरेश वायंगणकर
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)