You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर आणि बहीण मधुमतीचं बाँडिंग कसं आहे? घरचे काय सांगतात?
सोशल मीडियावर शेअर केलेले कौटुंबिक क्षण असोत की फिल्म इव्हेंट्स, कार्यक्रम असोत... अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकरसोबत तिची बहीण मधुमती इंदलकर अनेकदा दिसते. या दोघींनी नुकतेच एका जाहिरातीतही काम केलंय.
मधुमतीला डाऊन सिंड्रोम आहे, पण तरीही ती ज्या सहजतेने वावरते त्याचं कौतुक होताना दिसतं.
मधुमती 3 महिन्यांची असताना तिला डाऊन सिंड्रोम असल्याचं लक्षात आलं. ते स्वीकारून पुढे जाणं, तिला स्वावलंबनाने जगता येईल अशा पद्धतीने वाढवणं हे अवघडं होतं, मात्र तिच्या पालकांनी ते आव्हान पेललं.
मधुमतीच्या आवडीनिवडी या आता केवळ चार भिंतींपुरत्या मर्यादित राहिल्या नाहीयेत. तिने नुकताच एका जाहिरातीत अभिनय केलाय. ती भरतनाट्यम करते. खेळातही तिने स्पेशल ऑलिम्पिकमध्ये मेडल आणण्यापर्यंत यश मिळवलं आहे.
रिपोर्ट/शूट - गणेश पोळ
निर्मिती - अमृता कदम
एडिट - अरविंद पारेकर
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)