You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
वर्ग नसलेली दत्तात्रय वारे गुरूजींची शाळा नेमकी कशी आहे?
पुणे जिल्ह्यातील कनेरसर येथील जिल्हा परिषदेची शाळा आज अनेकांच्या स्वप्नातली शाळा म्हणून ओळखली जाते. या शाळेचा कायापालट करून शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडवणारे दत्तात्रय वारे गुरुजी यांची विशेष मुलाखत बीबीसी मराठीच्या 'महाराष्ट्राची गोष्ट' या सिरीजमध्ये घेण्यात आली आहे.
या मुलाखतीत वारे गुरुजींनी आपल्या शाळेचे नेमके स्वरूप कसे आहे आणि तिथे राबवले जाणारे वेगवेगळे प्रयोग कशा प्रकारे विद्यार्थी कशा प्रकारे राबवतात यावर भाष्य केलंय. या शाळेत विद्यार्थ्यांना जेवणानंतर झोपण्यासाठी ब्रेक का दिला जातो, विद्यार्थ्यांना रोबोटिक्स आणि AI सारखे विषय का शिकवले जातात, यासारख्या अनोख्या प्रयोगांच्या मागची भूमिका त्यांनी स्पष्ट केलीय.
यामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वात नेमकं काय परिवर्तन घडून आले आहे याबाबत वारे गुरूजींनी या मुलाखतीत संवाद साधला आहे. बीबीसी मराठीचे संपादक अभिजीत कांबळे यांनी घेतलेली ही खास मुलाखत नक्की पाहा
मुलाखत - अभिजीत कांबळे
शुट - नितीन नगरकर
एडिट - शरद बढे
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)