You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेल्या चौथ्या शाळेची गोष्ट
आज सावित्रीबाई फुले यांचा स्मृतिदिन आहे. सावित्रीबाई फुलेंनी मुलींची पहिली शाळा सुरू करून स्त्री शिक्षणाचा पाया रचला. यानंतर त्यांनी महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी मुलींच्या शाळा उभारण्यासाठी चळवळ उभा केली.
या दरम्यान पुण्याजवळील ओतूर येथे सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी चौथी शाळा सुरू केली. ही शाळा सुरू करण्यासाठी सावित्रीबाई स्वतः जवळपास एक महिना ओतूरमध्ये मुक्कामी राहिल्या होत्या. त्या काळात मुलींना शिक्षण देण्याला मोठा विरोध असतानाही त्यांनी हार न मानता शिक्षणासाठी आणि या शाळेसाठी संघर्ष केला.
आज तब्बल 178 वर्षांनंतरही ही शाळा अविरतपणे सुरू आहे. अनेक पिढ्यांतील मुलींनी या शाळेत शिक्षण घेतलं, स्वतःचं आयुष्य घडवलं आणि समाजात विविध क्षेत्रांत आपली ओळख निर्माण केली. एका छोट्याशा गावातून सुरू झालेली ही शाळा आज स्त्री शिक्षणाच्या इतिहासातील जिवंत वारसा मानली जाते.
या ऐतिहासिक शाळेचा प्रवास, सावित्रीबाईंचं योगदान आणि या शाळेतून घडलेल्या मुलींची कहाणी जाणून घेण्यासाठी बीबीसी मराठीने केलेला हा खास रिपोर्ट
रिपोर्ट - अमृता कदम आणि रितेश साळवे
शुट - रितेश साळवे आणि योगेश केळापुरे
एडिट - अरविंद पारेकर
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)