बैलांना शर्यतीत घेऊन जाणाऱ्या श्री लक्ष्मी व्हायरल कशा झाल्या?

बैलांना शर्यतीत घेऊन जाणाऱ्या श्री लक्ष्मी व्हायरल कशा झाल्या?

एका डौलदार बैलाला घेऊन जाणाऱ्या या आहेत श्री लक्ष्मी . हे दृश्य त्या वेळचं आहे, जेव्हा त्या घरच्या गोठ्यात वाढवलेल्या या बैलाला शर्यतीत सहभागी करण्यासाठी घेऊन जात होत्या.

श्री लक्ष्मी बैलांना स्पर्धेसाठी नेतानाचे अनेक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. श्री लक्ष्मी या आंध्र प्रदेशच्या बापटला जिल्ह्यातील वेटपालेम गावच्या रहिवासी आहेत. त्यांना बैलांविषयीची आवड त्यांचे पती रामकृष्ण यांनी लावली.

2017 पासून ते बैलांचे संगोपन करत होते आणि त्यांना स्पर्धांमध्ये पाठवत होते. सुरुवातीला श्री लक्ष्मी आणि त्यांच्या कुटुंबाने याला विरोध केला होता. पण रामकृष्ण यांची आवड आणि बैलांवरील प्रेम पाहून त्यांनाही हळूहळू या गोष्टीची आवड निर्माण झाली.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)