ऑस्कर पुरस्कार : 'वन बॅटल आफ्टर अनादर'ने जिंकला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार; पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी

'वन बॅटल आफ्टर अनादर' सिनेमानं सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर पुरस्कार मिळवला आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 'वन बॅटल आफ्टर अनादर' सिनेमानं सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर पुरस्कार मिळवला आहे.
वाचन वेळ: 3 मिनिटे

2026 च्या ऑस्कर पुरस्कारांचं अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये वितरण सुरू आहे.

'वन बॅटल आफ्टर अनादर' सिनेमानं सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर पुरस्कार मिळवला आहे.

हॉलिवूड अभिनेता मायकल बी. जॉर्डनला 'सिनर्स'मधील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे, तर 'हॅमनेट' सिनेमात शेक्सपिअरची पत्नी अ‍ॅग्नेस शेक्सपिअरची भूमिका साकारणारी जेसी बकलेला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.

हॉलिवूडमधील महत्त्वाच्या दिग्दर्शकांपैकी पॉल थॉमस अँडरसनला 'वन बॅटल आफ्टर अनादर'ला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला आहे.

सर्वोत्कृष्ट सहाय्यक कलाकाराचा पुरस्कार अभिनेते सीन पेन यांना 'वन बॅटल आफ्टर अनादर'मधील भूमिकेसाठी मिळाला आहे, तर सर्वोत्कृष्ट मूळ पटकथेसाठी रायन कुगलर यांना 'सिनर्स'साठी मिळाला आहे.

'सिनर्स'मध्ये अमेरिकेतील प्रोहिबिशन एराच्या (दारूबंदी) पार्श्वभूमीवर जुळ्या भावांची कथा आहे. श्वेत-अश्वेत संघर्ष या कथेच्या केंद्रस्थानी आहे.

सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, पटकथा लेखन, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता आणि सहायक अभिनेत्री, सिनेमॅटोग्राफी, एडिटिंग, अशा विविध कॅटेगरीमध्ये सिनर्सला नामांकन मिळालं आहे.

आतापर्यंत जाहीर झालेल्या पुरस्करांमधील बेस्ट डॉक्युमेंटरी शॉर्टमध्ये 'ऑल द एम्प्टी रूम्स' माहितीपटाने बाजी मारलीय, तर बेस्ट डॉक्युमेंटरी फीचरमध्ये 'मिस्टर नोबडी अगेन्स्ट पुतीन'ने बाजी मारलीय.

ऑस्कर पुरस्कार जिंकणाऱ्या आणि नामांकनं मिळालेल्या कलाकृती, कलाकारांची यादी इथे खाली देत आहोत. जसजशी पुरस्कारांची घोषणा होत आहे, तशी ही यादी अपडेट होत राहील :

सर्वोत्कृष्ट चित्रपट : 'वन बॅटल आफ्टर अनादर'

'वन बॅटल आफ्टर अनादर' सिनेमानं सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर पुरस्कार मिळवला आहे.

नामांकनाच्या यादीत बुगोनिया, फ्रँकेन्स्टाइन, एफ-वन, हॅमनेट, मार्टी सुप्रीम, द सिक्रेट एजंट, सेंटिमेंटल व्हॅल्यू, सिनर्स आणि ट्रेन ड्रीम्स हे सिनेमेही होते. मात्र, 'वन बॅटल आफ्टर अनादर' सिनेमानं बाजी मारली.

'वन बॅटल आफ्टर अनादर' हा आताच्या काळावर भाष्य करणारा अँटी-वॉर मूव्ही आहे. विषय अत्यंत गंभीर असला तरी मांडणी कॉमेडी आहे.

युद्धाची पार्श्वभूमी असली, तरी वडील-मुलीच्या नात्यावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. त्याच बरोबर श्वेत-अश्वेत संघर्ष, वर्ग लढा या संघर्षांची किनार या चित्रपटाला आहे.

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

  • जेसी बकले - हॅमनेट (विजेती)
  • रोझ बर्न - इफ आय हॅड लेग्ज आय'ड किक यू
  • केट हडसन - साँग संग ब्लू
  • रेनाटे रेन्सवे - सेंटिमेंटल व्हॅल्यू
  • एम्मा स्टोन - बुगोनिया

सर्वोत्कृष्ट अभिनेता

  • मायकल बी. जॉर्डन - सिनर्स (विजेता)
  • टिमोथी शॅलामे - मार्टी सुप्रीम
  • लिओनार्डो डिकॅप्रिओ - वन बॅटल आफ्टर अनादर
  • ईथन हॉक - ब्ल्यू मून
  • वॅग्नर मौरा - द सिक्रेट एजंट

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक

  • पॉल थॉमस अँडरसन - वन बॅटल आफ्टर अनादर (विजेता)
  • रायन कूगलर - सिनर्स
  • जॉश सफडी - मार्टी सुप्रीम
  • जोआकिम ट्रायर - सेंटिमेंटल व्हॅल्यू
  • क्लोई झाओ - हॅमनेट

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री

  • एमी मॅडिगन - वेपन्स (विजेती)
  • एले फॅनिंग - सेंटिमेंटल व्हॅल्यू
  • इंग्गा इब्सडॉटर लिलियास - सेंटिमेंटल व्हॅल्यू
  • वुनमी मोसाकू - सिनर्स
  • तेयाना टेलर - वन बॅटल आफ्टर अनादर

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता

  • सीन पेन - वन बॅटल अफ्टर अनादर (विजेता)
  • बेनिसियो डेल टोरो - वन बॅटल आफ्टर अनादर
  • जेकब एलोर्डी - फ्रँकेन्स्टाइन
  • डेलराय लिंडो - सिनर्स
  • स्टेलन स्कार्सगार्ड - सेंटिमेंटल व्हॅल्यू
सर्वोत्कृष्ट मूळ पटकथेसाठी रायन कुगलर यांना 'सिनर्स'साठी मिळाला आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सर्वोत्कृष्ट मूळ पटकथेसाठी रायन कुगलर यांना 'सिनर्स'साठी मिळाला आहे.

सर्वोत्कृष्ट मूळ पटकथा

  • सिनर्स - रायन कूगलर (विजेता)
  • ब्ल्यू मून - रॉबर्ट कॅप्लो
  • इट वॉज जस्ट अ‍ॅन अ‍ॅक्सिडंट - जाफर पनाही
  • मार्टी सुप्रीम - रोनाल्ड ब्रॉनस्टीन आणि जोश सफडी
  • सेंटिमेंटल व्हॅल्यू - एस्किल वोग्ट आणि जोआकिम ट्रायअर

सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी फीचर

  • मिस्टर नोबडी अगेन्स्ट पुतीन (विजयी)
  • कम सी मी इन द गुड नाईट
  • कटिंग थ्रू द रॉक्स
  • द अलाबामा सोल्युशन
  • द परफेक्ट नेबर

सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्री शॉर्ट

  • ऑल द एम्प्टी रूम्स (विजयी)
  • आर्म्ड ओन्ली विथ अ कॅमेरा : द लाईफ अँड डेथ ऑफ ब्रेंट रेनॉड
  • चिल्ड्रन नो मोअर : वेअर अँड आर गॉन
  • द डेव्हिल इज बिझी
  • परफेक्टली अ स्ट्रेंजरनेस

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)