You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बापूसाहेब गायकवाड यांना UPSC परीक्षेत यश मिळवण्यासाठी प्लॅन बी महत्त्वाचा का वाटतो?
2025 मध्ये घेण्यात आलेल्या UPSC च्या परीक्षेत बापूसाहेब गायकवाड यांनी यश मिळवलं आहे. त्यांनी या परीक्षेत 561वी रँक मिळाली आहे.
बापूसाहेब ज्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीतून पुढे आले आहेत, त्यामुळे त्यांचं विशेष कौतुक होत आहे. तसंच त्यांच्या आई-वडिलांनी मुलांच्या शिक्षणासाठी अहोरात्र मेहनत घेतली.
बापूसाहेबांनी BA आणि MA मी मुक्त विद्यापीठातूनच केलं. सोबतच प्लॅन बी असावा म्हणून UGC नेटची परीक्षाही पास केली. UPSCसोबत ते इतर परीक्षांची पण करत होते. 2019 साली माझं CAPF साठीही सिलेक्शन झालं होतं.
ते सांगतात, "या स्पर्धा परीक्षांच्या प्रवासात एक गोष्टी जी निश्चित असते ते म्हणजे अपयश. कारण का दहा लाख लोक UPSC चा फॉर्म भरतात आणि हार्डली एक हजार लोक सिलेक्ट होतात. 0.05 रिझल्ट लागतो. आयुष्याची खूप मोठी रिस्क आपण घेत असतो. त्यामुळे प्लॅन B सोबत ठेवणं किंवा काहीतरी काम करत असताना आपण तयारी केली, तर मला वाटतं आपण हे करू शकतो."
अधिक जाणून घेण्यासाठी पाहा हा खास रिपोर्ट.
रिपोर्ट, शूट, एडिट - गणेश पोळ, बीबीसी मराठी प्रतिनिधी.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)