पोलीस भरतीच्यावेळी मृत्यू, दीपक व्हावळेच्या आईचा आक्रोश

व्हीडिओ कॅप्शन, पोलीस होण्याचं दिपकचं स्वप्नं अधुरं, दीपक व्हावळेच्या आईचा आक्रोश
पोलीस भरतीच्यावेळी मृत्यू, दीपक व्हावळेच्या आईचा आक्रोश

बीड जिल्ह्यातल्या परळी तालुक्यात राहणारा 26 वर्षीय दीपक वाव्हळे. पोलीस होण्याचं स्वप्न उराशी बाळगून तो वर्षानुवर्षे तयारी करत होता. 11 फेब्रुवारीला पोलीस दलाच्या भरती प्रक्रियेदरम्यान 1600 मीटर धाव पूर्ण केल्यानंतर दीपकची तब्येत बिघडली. आणि काही वेळातच त्याचा मृत्यू झाला.

भूमिहीन, मजुरीवर अवलंबून असलेल्या कुटुंबासाठी दीपक हा घरातला कर्ता मुलगा होता. आयटीआयचं प्रशिक्षण घेतलेल्या दीपकला चांगली नोकरी करायची होती. त्यासाठी सतत तयारी करायचा, असं त्याचे वडील सांगतात. आपल्या लहान भावानेही शिकावं, परीक्षा द्यावी आणि नोकरी करावी यासाठी तो त्याच्या मागे लागायचा.

ग्रामीण भागातील हजारो तरुण बारावी नंतर वर्दीचं स्वप्न पाहत दररोज मैदानात धाव घेतात. मेहनती दीपक त्यापैकीच एक होता.

शूट- संजीब रॉय

व्हीडिओ एडिट- अरविंद पारेकर